मिशन-यांना प्रेरणा देणारा संत फ्रान्सिस झेव्हियर धर्मग्रामाचा आश्रयदाता व आरोग्यदायी माता पवित्र मारिया हा दुहेरी ४९ वा यात्रा महोत्सव दि. ०१/१२/२०२४ रोजी कॅथोलिक चर्च, टिळकनगर साजरा करत आहेत.
टिळकनगर :- मिशन-यांना प्रेरणा देणारा संत फ्रान्सिस झेव्हियर धर्मग्रामाचा आश्रयदाता व आरोग्यदायी माता पवित्र मारिया हा दुहेरी ४९ वा यात्रा महोत्सव दि. ०१/१२/२०२४ रोजी कॅथोलिक चर्च, टिळकनगर साजरा करत आहेत. सर्व भाविकांना या यात्रेसाठी संत फ्रान्सिस झेवियर, टिळकनगर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह फादर पीटर डिसोजा व इतर सहाय्यक धर्मगुरु, धर्मभगिनी, चर्च संलग्न सर्व संघटना व तेथील समस्त ख्रिस्ती भाविक यांनी सर्व ठिकाणच्या ख्रिस्ती भाविकांना हार्दिक आमंत्रित केलेले आहे.
या यात्रेची अध्यात्मिक पूर्वतयारी म्हणून गुरूवार दिनांक २८/११/२०२४ ते दिनांक ३०/११/२०२४ शनिवार पर्यंत त्रिदिनी भक्ती सायंकाळी ठीक ५:३० वाजता भाविकांसाठी ठेवण्यात आली आहे. या तीन ही दिवशी वेगवेगळ्या महत्वाच्या आवश्यक विषयांवर ( ख्रिस्ती कुटूंब, युवक चर्च व चर्च माझी जबाबदारी ) प्रवचन विषारद रेव्ह फादर प्रकाश भालेराव, रेव्ह फादर डॉमिनिक रोझारियो व रेव्ह फादर रॉनी परेरा यांना आध्यात्मिक तयारी साठी पाचारण केले आहे. या तीन ही दिवसांसाठी वेगवेगळ्या ख्रिस्ती विभाग व गांवाचे भक्तीसाठी नियोजन केले आहे.
या यात्रेचा म्हणजे सनाचा दिवस समजला जातो तो दिवस म्हणजे १ डिसेंबर २०२४ रोजी पवित्र मारिया प्रतिमेची मिरवणूक ही दरवर्षी प्रमाणे दत्तनगर येथील चर्च पासून सकाळी ९:०० वाजता निघून टिळकनगर चर्च पर्यंत असेल. यावेळी सर्व भाविकांना या धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू यांनी नियमांचे पालन करुन समाजासाठी ख्रिस्ती धर्माचा शांती, ऐक्य व प्रेमाचा संदेश देण्याचे आव्हान सर्व भाविकांना केले. सर्वांची उपस्थिती महत्त्वाची असावी अशी विनंती केली.