' अल्पवयीन मुलीच्या विनयभंगा प्रकरणी आरोपीस ३ वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा .
अहमदनगर : आरोपी नामे संतोष तुकाराम गायकवाड , वय - २७ वर्षे , रा . उक्कलगाव ता . श्रीरामपुर जि . अहमदनगर याने पिडीत फिर्यादी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अहमदनगर येथील मा . माधुरी एच . मोरे मॅडम , अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोषी धरून भा.दं.वि. कलम ३५४ , ३५४ ( अ ) ( १ ) ( २ ) ३५४ ( ब ) नुसार दोषी धरून आरोपीस ३ वर्षे सक्त मजुरी व रूपये २,००० / - दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . घटनेची थोडक्यात हकीगत की , दिनांक २०.० ९ .२०१५ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास पिडीत मुलगी हि टी.व्ही पाहणेसाठी आरोपीच्या आत्याच्या घरी गेली होती . त्यावेळी आरोपी संतोष तुकाराम गायकवाड हा एकटाच घरामध्ये होता . त्यावेळी त्याने घरात इतर कोणी नाही हे पाहून घराचा पुढील दरवाजा , लाईट व टी . व्ही बंद करून पिडीत मुलीस ओढत पाठीमागच्या अंगणात घेवून गेला व तिला मारहाण करून तिच्या अंगावरील कपडे काढले . तसेच आरोपी तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असताना , आरोपीची चुलत बहिण तेथे आल्याने आरोपी तेथून पळून गेला . पिडीत मुलीने तिच्या आईला सदरची घटना सांगितल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने आरोपी विरुध्द राहुरी पोलिस स्टेशनला रितसर फिर्याद दिली . घटनेचा संपूर्ण तपास पी . एस . आय . महावीर जाधव यांनी करून मा . न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले . यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी , पिडीतेची आई , पंच साक्षीदार , तपासी अधिकारी , वयासंदर्भात मुख्याध्यापक यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या . तसेच आरोपी तर्फे आरोपीच्या चुलत बहिणीची साक्ष नोंदविण्यात आली . चुलत बहिणीच्या साक्षीमध्ये चुलत आरोपीच्या वकीलांनी आरोपीने सदरचा गुन्हा केला नाही केवळ फिर्यादी व आरोपीची बहिण यांचे लहान मुलांवरून भांडण झाले . यावेळी चुलत बहिणीने आरोपीला बोलावून तुमचा बेत बघते असे बोलल्याचा राग आल्याने फिर्यादीने पिडीत मुलीस हाताशी धरून आरोपी विरुद्ध खोटी केस दाखल केले बाबत पुरावा आणण्याचा प्रयत्न केला . परंतु , सरकारी वकीलांनी युक्तीवादाचे वेळी मे . कोर्टाचे निदर्शनास आणून दिले की , जर लहान मुलांमध्ये भांडण झाल्याची घटना झाली असती तर फिर्यादीने आरोपी सोबत भांडण झालेल्या त्याच्या चुलत बहिणीचा देखील फिर्यादीमध्ये नाव घेतले असते . परंतु फिर्यादीमध्ये कुठेही चुलत बहिणीच्या नावाचा उल्लेख नाही . सदरचे केसमधील पिडीत • मुलगी ही केवळ ११ वर्षे वयाची आहे . आरोपी हा पिडीत मुलीचा देखील नातेवाईक आहे . पिडीत मुलगी आरोपी विरुध्द खोटे का सांगेल याबाबत कुठलेही कारण आरोपीच्या वकीलांनी मे . कोर्टासमोर आणले नाही असा युक्तीवाद केला . सरकारी वकीलांचा युक्तीवाद तसेच आलेला पुरावा ग्राहय धरून आरोपीस मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . त्यांना पैरवी अधिकारी आडसुळ तसेच पो.कॉ. संजय पठारे यांनी सहकार्य केले .
अहमदनगर ता . १६/०१/२०२३
( अॅड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )
विशेष सरकारी वकील ,
अहमदनगर .
मो . ९ ८५०८६०४११,
८२०८ ९९ ६७ ९ ५ .