नेवासा तहसील व पोलीस स्टेशन प्रांगणातील प्रेस क्लबच्या पाणपोईचे सौ.सुनीताताई गडाख यांच्या हस्ते उदघाटन
नेवासा तहसील व पोलीस स्टेशन प्रांगणातील प्रेस क्लबच्या पाणपोईचे सौ.सुनीताताई गडाख यांच्या हस्ते उदघाटन
नागरिकांची गरज ओळखून नेवासा प्रेस क्लबने राबविलेला पाणपोई सारखा उपक्रम कौतुकास्पद-सौ.सुनीताताई गडाख
नेवासा(प्रतिनिधी)नेवासा येथील तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन प्रांगणात नेवासा प्रेस क्लबने सुरू केलेल्या पाणपोईचे उदघाटन नेवासा तालुक्यातील महिला बचत गटाच्या मार्गदर्शक व नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.सुनीताताई गडाख यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. पाणपोई सारखा उपक्रम हा तहानलेल्या जीवांची तृष्णा भागविणारा असून तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनला येणाऱ्या नागरिकांची गरज ओळखून नेवासा प्रेस क्लबने राबविलेला पाणपोई सारखा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार सौ.सुनीताताई गडाख यांनी यावेळी बोलतांना काढले.
यावेळी झालेल्या पाणपोईच्या उदघाटन प्रसंगी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे,महसूल विभागाचे नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड,प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे,नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित,पोलीस महिला सुरक्षा समितीच्या सदस्या सौ.शोभाताई आलवणे यावेळी उपस्थित होते.उपस्थित
पाणपोई उदघाटन प्रसंगी नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी आलेल्या अतिथीचे स्वागत केले.प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे यांनी प्रेस क्लबच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची दिली.संपर्क प्रमुख सुधीर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.नेवासा तालुक्यात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची तृष्णा भागविता यावी म्हणून प्रेस क्लब ने पाणपोई सारखा उपक्रम सुरू केला असल्याचे सांगितले.
यावेळी बोलतांना सौ.सुनीताताई गडाख म्हणाल्या की नेवासा तालुक्यातील हजारो लोक येथे विविध कामांसाठी तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनला येतात त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून नेवासा प्रेस क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पाणपोई उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने तो कौतुकास्पद असा आहे असे सांगून त्यांनी पाणपोई उपक्रमाला शुभेच्छा देत नेवासा प्रेस क्लबला धन्यवाद दिले.
यावेळी सौ.सुनीताताई गडाख यांच्यासह नव्याने आलेले पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे,नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड,चित्रकार भरतकुमार उदावंत यांचा नेवासा प्रेस क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्यांनी नेवासा प्रेस क्लबने सुरू केलेल्या पाणपोई उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.यावेळी नेवासा शहराचे बिट प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल तुळशीराम गीते,नगरसेवक राजेंद्र मापारी,संभाजीराव शिंदे,प्रेस क्लबचे सदस्य कैलास शिंदे,शाम मापारी,रमेश शिंदे,सुहास पठाडे,शंकर नाबदे,अभिषेक गाडेकर, पवन गरुड,मकरंद देशपांडे,भैया कावरे,कृष्णा गायकवाड,नितीन मिरपगार, आयुब पठाण,अस्लमभाई मन्सूरी,जालिंदर गवळी,सुनील जाधव, जयदीप जामदार,विशाल सुरडे,होमगार्ड पलटण नायक दिलीप गायकवाड, संजय चांदणे उपस्थित होते.
लवकरचं प्रेस क्लब च्या माध्यमातून बस स्थानक , पंचायत समिती या ठिकाणी आणखी पाण पोई चे नियोजन करणार आहे हे कार्य सर्वांच्या सहकाऱ्याने असून तालुक्यातील पत्रकार यांचा देखील हातभार या कार्याला असणार आहे
अशी माहिती नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी दिली.