बालाजी देडगाव येथे मंगळवार देि. 22 रोजी वै. कारभारी देवा गोयकर यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार संपन्न.

बालाजी देडगाव येथे मंगळवार देि. 22 रोजी वै. कारभारी देवा गोयकर यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार संपन्न.

बालाजी देडगाव:- ( प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे जळगाव रोड गोयकर वस्ती येथे वैकुंठवासी कारभारी देवा गोयकर यांची

मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार असून त्या निमित्ताने रविवार दिनांक 20 रोजी सकाळी 9 ते 11 मिरवणूक व पुण्यवाचन होणार आहे. व सोमवार 21 रोजी दुपारी तीन ते चार या वेळेत मूर्ति प्राण प्रतिष्ठा व कलश रोहन संपन्न होणार आहे .तरी मंगळवार दिनांक 22 रोजी सकाळी 9 ते 11 पूर्णाहुती व महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह भ प रामायणाचार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे (जेऊर है.) यांचे हरिकीर्तन होणार आहे तर नंतर लगेचच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .

         अशी माहिती माजी सरपंच रामेश्वर गोयकर यांनी दिली आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहावे अशी देडगाव परिसरातील भाविकांना विनंती करण्यात आली आहे.

          हा सोहळा ह भ प गाथामूर्ती सुखदेव महाराज मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून ,समस्त देडगाव व पाचुंदा भजनी मंडळी यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.