भातकुडगाव भायगाव हिंगणगाव परिसरात अवकाळी पावसाने मोठे नुकसान

भातकुडगाव भायगाव हिंगणगाव परिसरात अवकाळी पावसाने मोठे नुकसान

भातकुडगाव भायगाव हिंगणगाव परिसरात गारां,विजाच्या कडकडासह जोरदार पाऊस. 

शेवगाव :- शेवगाव तालुक्यातील पश्चिम भागातील भातकुडगाव, भायगाव, हिंगणगाव, देवटाकळी, गुफा, ढोरजळगाव, आव्हाणे, बऱ्हाणपूर,बत्तरपूर परिसरात दि.7 रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने कांदा, गहू पिकाची चागलीच वाताहत केली. गराचा पाऊस झाल्याने कांदा पिकाला पातच राहिली नसून काढणीला आलेल्या गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास सोसाटीच्या वारा वा पडलेल्या गराचा पावसाने शेतकऱ्याच्या हातातोडी आलेला घास हिरावून घेतला आहे. आधीच शासनाने शेतमालाचे भाव व झालेला खर्च याचा ताळमेळ बसत नसताना आधीच खचलेल्या बळीराज्याचे अवकाळी पावसाने कंबरडेच मोडले आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडले नसून ती नुकसान भरपाई अद्यापही बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळणे बाकी असताना आता नवीन संकट उभे राहिले आहे. तसेच ढोरजगाव, आव्हने परिसरात सायंकाळी जोरदार पाऊस झाला. यामध्ये कांदा, गहू पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी नुकसानग्रस्त भागातील पिकाचे त्वरित प्रशासनाच्या वतीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

शेवगाव तालुक्यातील शेकऱ्याचे अवकाळी पावसाने मोठया प्रमाणत कांदा, गहू पिकाचे नुकसान झाले असून बळीराजा मोडकळीस आला आहे, मागील अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नसतानाच आता परत पावसाने पिके नष्ट झाली असून. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी. -  

सौ. हर्षदाताई काकडे.जि.प.सदस्या.

परिसरात फळबाग व कांदा गहू पीक मुख्यत्वे मोठया प्रमाणात घेतले जाते दि. 7 रोजी सायंकाळी गारांच्या पावसाने पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्याच्या नुकसानीची त्वरित पाहणी करून मदत मिळावी. :-

विष्णू दिवटे, शेतकरी बऱ्हाणपूर.