*पोलीस जाणीव सेवा संघ महिला बार्शी टीमच्या वतीने मकर संक्रांती निमित्त हळदी-कुंकवाचा आयोजित कार्यक्रम संपन्न*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी)
बार्शी (ता. बार्शी) दि.21-01-2023 रोजी पोलीस जाणीव सेवा संघ संस्थापक अध्यक्ष रवी सर फडणीस यांच्या आदेशानुसार, पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा बार्शी महिला पदाधिकारी व सदस्या यांच्यावतीने बार्शी येथे आदर्श लॉन्स या ठिकाणी संक्रांती निमित्त हळदी- कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी सर्व संघाच्या महिलांच्या वतीने बार्शी शहर व तालुका पोलीस स्टेशनचे महिला पोलीस भगिनी, तसेच तहसील कार्यालय, नगरपरिषद, सरकारी हॉस्पिटल व नामांकित व सर्वसामान्य महिलांना एकत्र बोलवून हळदी-कुंकवा निमित्त गुळाचे ढेपी चे व इतर वाणाचे साहित्य देऊन मोठ्या उत्साहात कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये जवळ-जवळ 150 ते 180 महिला भगिनी उपस्थित होत्या. यावेळी सर्वांना संघा विषयी माहिती देण्यात आली.
बार्शी आदर्श उद्योग समूहाचे प्रमुख रवींद्र राऊत यांचा पोलीस जाणीव सेवा संघाच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
हा यशस्वी कार्यक्रम पार पाडण्यासाठी संघातील सर्व महिला पदाधिकारी, सदस्या यांनी मेहनत घेतली.संघाचे बार्शी तालुका महिला अध्यक्षा सुप्रियाताई काशीद यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.