शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना पुरेशा बस नाहीत. ज्या बस आहेत त्या बस स्टॉप वर थांबत नाहीत.

शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागातुन येणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना पुरेशा बस नाहीत आहे त्या बस थांब्यावर उभ्या राहात नाहीत.

शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागातुन सुमारे दहा हजार विद्यार्थी शिक्षणासाठी शेवगाव शहरात ये जा करत असतात राक्षी चापडगांव बोधेगान ठाकूर पिंपळगांव हासनापूर कोलगाव भातकुडगाव यां व ईतर भागातुन शकडो विद्यार्थी अप डाऊन करतात पण शाळे पेक्षा जास्त वेळ त्यांचा एस टि ची वाट पाहण्यात जातो पालक घरी राहु देईना आणि मास्तर शाळेत उशिरा येऊ देईना चिमुरडी मुलं आपला जीव मुठीत घेऊन राज्य महामार्गावर तासंतास एस टि ची वाट पाहतात .ग्रामीण भागातील नागरिक तक्रार घेऊन शेवगाव डेपोमध्ये गेल्यास ग्रामपंचायत ठराव आणा शाळेचे पत्र आणा अशी उत्तरे देतात मग हजारो पास वाटले कशाला एक तर गैरसूईमुळे शिक्षणाचे  विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. दोन वर्षांनी शाळा सुरु झाल्या तर एस टि चे वेळापत्रक आणि शाळेचे वेळापत्रक यांचा मेळ घालण्यात शैक्षणिक नुकसान होत आहे .तालुक्याच्या पुर्व भागातील गावामध्ये मुक्कामी बस वाढविण्याची गरज आहे.

कोरोना काळात आणि नंतर कर्मचाऱ्यांचा संपामुळे व ना दुरुस्त एसटी प्रमाण जास्त असल्यामुळे बाहेरच्या लांब पल्याच्या गाड्या पास चे विद्यार्थी घेत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.