रिधोरा येथील आरोग्य केंद्रात संसर्गजन्य रोग निदान शिबीर
1.
काटोल:- ०४ नोव्हें ला आरोग्य सेवा केंद्र, रिधोरा येथे सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत संसर्ग जन्य आजार, बी.पी. शुगर ,कॅन्सर ची तपासणी करण्यात आली आहे. तसेच थायरॉईड मोतीबिंदू या सारख्या रोगाची तपासणी शिबिराद्वारे करण्यात आले. या शिबिरामध्ये 30 वर्षा वरील नागरिकांनी शंभर पेक्षा जास्त संभाव्य नागरिकांनी तपासणी करून घेतली आहे. यावेळी नवनिर्वाचित काटोल पंचायत समीतीचे सभापती संजय डांगोरे यांनी शिबीरस्थळी भेट देउन आरोग्य सेवा केंद्राची पाहणी करून अधीकार्यांना योग्य निर्देश दिले.
या आरोग्य शिबीरा करीता डाँ.नागपुरे,डाँ. वानखडे ,हेंमत गोंडाने,वर्षा बोबडे,नंदकिशोर चिमोटे,मेघा नागपुरे,मंदाताई डोंगरे,सुनीता नागपुरे,पुरुषोत्तम वाघमारे या आरोग्य कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले. रुग्न तपासनी वेळी पसं.सभापती संजय डांगोरे यांचे सहकारी नत्थुजी तभाने,विजय महल्ले,भगवान तभाने,धनराज दिडसे,भुषन मुसळे,मिलींद वाहने,शामरावजी तभाने आदींची उपस्थीती होती.