प्रथम पुण्यस्मरण निमित्त वांढेकर परिवाराने अनोखा उपक्रम करून केले पितृऋण अदा.
*प्रथम पुण्यस्मरण निमित्त वांढेकर परिवाराने अनोखा उपक्रम करुन केले पितृऋण अदा.*
बालाजी देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण) तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कै. सोपानराव किसन वांढेकर यांचे प्रथम पुण्यस्मरण ह भ प भागचंद महाराज पाठक यांच्या मधूर वाणीतून सृश्राव्य किर्तनाने पार पडले.
वांढेकर परिवारातील कै. सोपानराव यांचे एका वर्षापूर्वी हृदयविकाराने दुःखद निधन झाले होते .त्यांच्या जाण्याने वांढेकर परिवारावर दुःखाचे संकट कोसळले होते. अतिशय शांत ,संयमी स्वभावाची असणारे, वारकरी संप्रदायातील ,बालाजी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व शेतकरी कुटुंबातील गृहस्थ जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती. अध्यात्मिक वारसा असणार धार्मिक परिवार कायम दुसऱ्याच्या सुख- दुःखात सहभागी होणार संस्कारीक कुटुंब आहे.
त्यानिमित्ताने कै. सोपानराव यांचे सूपुत्र किशोर वांढेकर यांच्या संकल्पनेतून व सामाजिक भावनेतून प्रथम पुण्यस्मरण निमित्त पितृऋण अदा करण्याची छोटीसी संधी मिळाली. म्हणून अनावश्यक खर्चाला फाटा देत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गावठाण व ७ जिल्हा परिषद वस्तीशाळा , अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल, बालाजी मंदिर , हनुमान मंदिर श्री क्षेत्र म्हसले यांना ( डिजिटल वॉच) नवीन उत्कृष्ट पद्धतीचे घड्याळ यांना भेट देण्यात आले. तर महादेव मंदिर सभा मंडपाच्या बांधकामासाठी ५१११ रुपये देणगी देण्यात आली.
अनेक मान्यवरांनी त्यांच्या जीवनचरित्राविषयी अनमोल माहिती देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.अशा विविध उपक्रमांनी कै. सोपानराव यांचे प्रथम पुण्यस्मरण संपन्न करण्यात आले.
या पुण्यस्मरणासाठी ह भ प सुखदेव महाराज मुंगसे, ह भ प पाटेकर महाराज ,ह भ प युवा कीर्तनकार प्रदीप महाराज वाघमोडे , ह भ प बाबासाहेब महाराज वांढेकर व बालाजी भजनी मंडळ तसेच परिसरातील भजनी मंडळ ही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन रूपी सेवेची शोभा वाढवली. तर देडगाव परिसरातील ग्रामस्थ, सगे समंधी , मोठा मित्र परिवार व श्रोते मंडळी मोठ्या संख्येने लाभले.
या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.