नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव उत्साह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .गावातील सर्वच प्रशासकीय व शैक्षणिक ठिकाणी हा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला .

प्रथमतः ग्रामपंचायत देडगाव कार्यालयासमोर देशाचे जवान ज्ञानेश्वर औटी, शिवाजी पठाडे, पोलीस कानडे साहेब, माजी सैनिक काळे मेजर, माजी सैनिक नरेश मेजर मुंगसे, यांच्या हस्ते ध्वजारोहणाची पूजा करून देडगावच्या लोकनियुक्त सरपंच स्वातीताई चंद्रकांत मुंगसे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने मेजर ज्ञानेश्वर औटी, मेजर शिवाजी पठाडे, मेजर पोलीस कानडे साहेब, माजी सैनिक काळे मेजर, माजी सैनिक नरेश मेजर यांचा सन्मान करण्यात आला .यावेळी युवा नेते चंद्रकांत पाटील मुंगसे यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव दिन आपण गावात साजरा करत आहोत .ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांच्या भावना मनात आपल्या तेवत राहावे सदैव आपल्या स्मरणात यांचं बलिदान राहावं म्हणून आपण हा स्वातंत्र्य महोत्सव साजरा करत आहोत. व शूर वीर या देशाची भूमिपुत्र सैनिक ही खरी देशाची संपत्ती आहे. या शब्दात ग्रामस्थांचे, उपस्थितांचे आभार मानत त्यांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

  यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव येथेही संचालक बाजीराव पाटील मुंगसे ,माजी ग्रामसेवक भाऊसाहेब मुंगसे ,माजी उपसभापती कारभारी चेडे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे ,यांच्या हस्ते ध्वजारोहण ची पूजा करून सरपंच सौ .स्वातीताई चंद्रकांत मुंगसे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व 75 व्या अमृत महोत्सव दिनानिमित्त 75 वृक्षांचे वृक्षारोपण शाळेत करण्यात आले .

  यानंतर अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ही मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व या उत्सवानिमित्त शाळेत रंगीत संगीत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. व वृक्षारोपणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .

  यावेळी उपस्थित राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभिजीत ससाने, उपसरपंच लक्ष्‍मणराव गोयकर, विद्यमान चेअरमन महेश कदम , व्हॉईस चेरमन रामभाऊ कोकरे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे ,युवानेते निलेश कोकरे, जेष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके,पत्रकार विष्णू मुंगसे, अशोक मुंगसे,मार्केट कमिटी संचालक कडूभाऊ तांबे ,देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, श्रीकांत हिवाळे, संतोष टांगळ, दिलदार सय्यद ,लक्ष्मण मुंगसे सर ,सचिव रामानंद मुंगसे ,विजय चेडे , प्रगतशील बागातदार बन्सी पाटील मुंगसे, राजेंद्र लाड साहेब, ग्रामविकास अधिकारी संतोष उल्ल्हरे, तलाठी बालाजी मलदोडे ,कृषी अधिकारी गोरक्षनाथ काळे ,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गवळी व सर्व टीम, अंगणवाडी सेविका ,मदतनीस, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर व सर्व टीम ,अहिल्याबाई होळकर शाळेचे प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड व सर्व शिक्षक वृंद, सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य, माजी विद्यार्थी संघ २००३ शिवनेरी ग्रुप व बजरंग दल व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

बी पी एस

प्रतिनीधी युनूस पठाण.