ट्रक मालकाचा विश्वासघात करून ड्रायव्हर व क्लिनर यांनी संगनमताने पळवलेला ट्रक सोनई पोलिसांकडून मुद्देमालासह जप्त.

ट्रक मालकाचा विश्वासघात करून ड्रायव्हर व क्लिनर यांनी संगनमताने पळवलेला ट्रक सोनई पोलिसांकडून मुद्देमालासह जप्त.

ट्रक मालकाचा विश्वासघात करून ड्रायव्हर व क्लिनर यांनी संगनमताने पळवलेला ट्रक सोनई पोलिसांकडून मुद्देमालासह जप्त.. 

खेडले परमानंद ( वार्ताहर) -- दि. १० जुन रोजी जवळाअर्जुन ता. पुरंदर येथील शरद सुधाकर टेकावडे यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. यशवंत नगर सोनई येथील ड्रायव्हर अर्जुन सोमनाथ सोनवणे व क्लिनर नवनाथ साळवे रायपूर राज्य छत्तीसगढ येथुन ट्रक मध्ये ३० टन लोखंडी पाईप भरून ते पुणे येथे खाली करण्यासाठी दिले होते. अशी फिर्याद सोनई पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गु. र. नं. २५८/२०२३ भा. द. वि. कलम ४२०,४०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या नुसार सोनई पोलीसांनी जलद गतीने तपास करुन गुन्ह्यात चोरीला गेलेले पाईप हे वाजुंळीशिवारात विक्री केली असल्याची माहिती मिळाली. आरोपी सतिष शिवाजी खंडागळे रा. वांजोळी ता. नेवासा यास अटक करून त्याच्याकडून सुमारे ३८ हजार रुपये किंमतीचे लोखंडी पाईप जप्त केले. उर्वरित पाईप हे नितीन विलास शिरसाठ रा. लोहगाव याच्या मार्फत राजेंद्र मुंदडा रा. लासुर स्टेशन ता. गंगापूर जि. संभाजीनगर यास २३टन ९६० किलो वजनाचे पाईप विक्री केले असल्याची माहिती दिली त्यानुसार १४ लाख ३८ हजार रुपये किंमतीचे लोखंडी पाईप जप्त केले आहे. सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला , मा. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर श्रीरामपूर, तसेच सुनील पाटील मा. उप विभागीय अधिकारी शेवगाव , यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पो. स. ई. राजु थोरात, पो. हे. काॅ. एम . आर. अडकित्ते , पो. हे. काॅ. दत्ता गावडे, पो. काॅ. विठ्ठल थोरात, पो. काॅ. निखिल तमनर , पो. काॅ. महेंद्र पवार यांनी केली