राहुरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्गा लगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे चार एटीएम मशिन दिवसा ढवळ्या फोडल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले.

राहुरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्गा लगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे चार एटीएम मशिन दिवसा ढवळ्या फोडल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले.

राहुरी प्रतिनिधी,

राहुरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्गा लगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे चार एटीएम मशिन दिवसा ढवळ्या फोडल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना दि. ३० एप्रिल रोजी सकाळच्या वेळी घडली. 

         राहुरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्गालगत स्टेट बँक ऑफ इंडियाचे चार एटीएम मशिन आहेत. दि. ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका इसमाने सदर चारही एटीएम मशीन दगडाच्या सहाय्याने फोडून मोठे नुकसान केले. यावेळी बॅक कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते, पोलिस नाईक योगेश आव्हाड, जयदिप बडे, नदीम शेख आदि पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित इसमास ताब्यात घेतले. 

         ताब्यात घेतलेला इसमाचे नाव सिद्धार्थ अप्पासाहेब वराळे, रा. वराळे वस्ती, राहुरी असे असून तो माथेफिरू असल्याची माहिती समोर आली आहे. राहुरी पोलिस ठाण्यात दुपारी उशीरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरु होते. मात्र या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे

राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे