डाॅ. आंबेडकर जयंतीनिमित्त दिपक कदम यांना डॉ . बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०२४ पुरस्काराने सन्मानित...

डाॅ. आंबेडकर जयंतीनिमित्त दिपक कदम यांना डॉ . बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०२४  पुरस्काराने सन्मानित...

  श्रीरामपूर:- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती निमित्ताने श्रीरामपूर तालुक्यातील समाजसेवक दिपक कदम यांच्या गौरव कार्याचा सन्मान म्हणून त्यांना डॉ . बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०२४  पुरस्काराने गौरवण्यात आले.

          दिपक कदम यांना पुरस्कार देताना सोनगाव पॅरीसचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.विल्सन,सचिन गुजर,माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, सिध्दार्थ मुरकूटे, आश्पाकभाई शेख, राजेश अलग नगरसेवक, रविंद्र गुलाटी राजु साळवे राजु  सूर्यवंशी रामदास ढोकणे डॉक्टर रवींद्र कुटे जेम्स पंडित शशिकांत गायकवाड लहानु त्रिभुवन यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.