राहुरीत दरोड्याच्या तयारीत असणारी परराज्यातील गुन्हेगारांची टोळी जेरबंद, आरोपीविरुद्ध 34 गुन्हे दाखल असल्याची माहिती आली समोर .

राहुरीत दरोड्याच्या तयारीत असणारी परराज्यातील गुन्हेगारांची टोळी जेरबंद, आरोपीविरुद्ध 34 गुन्हे दाखल असल्याची माहिती आली समोर .

*दरोडयाचे तयारीत असणारी परराज्यातील सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद -1,03,050/- रुपयांचा मुददेमाल जप्त* 

 

* 4 आरोपी अटक

 

*संभाजीनगर शहर, सोलापूर, पुणे व अहमदनगर येथे केलेले 4 गुन्हे उघडकीस.*

 

*या पूर्वी अटक आरोपीविरुद्ध एकूण 34 गुन्हे बिहार राज्यात व दिल्ली येथे दाखल आहेत

 

* चोरीच्या २ motorcycle जप्त 

 

 

            दिनांक - 07/03/2024 रोजी गोपनिय बातमी दरमार्फत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना बातमी मिळाली की, राहुरी येथे बँकेचे कॅश पार्टी वर पाळत ठेवून दरोड्याच्या तयारीने बिहार राज्यातील 6 आरोपी हे राहुरी येथे आलेले आहे. प्राप्त गोपनीय बातमीच्या आधारे नगर ते मनमाड जाणारे रोडवरील, राहुरी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडीया राहुरी शाखा समोर रोडवर दुपारी 16.45 वा. सुमारास छापा टाकुन दरोडयाचे तयारीत असणारे आरोपी नामे 1) राहुल कुमार गुलाबचंद यादव वय 23 वर्ष , 2) सिंटु कुमार रामसिंग यादव ,वय 29 वर्ष, , राज्य बिहार पोलीस स्टेशन कोडा , 3) अजित ऊर्फ गौतम गुरुददीन यादव, 4)चंदन कुमार गुल्ला यादव , सर्व रा.नथीला, नयाटोला जुराबगंज, ता.जि.काठियार , राज्य बिहार पोलीस स्टेशन कोडा यांना एकुण 1,03,050/- रुपये किंमतीचे लोखंडी टॉमी,सुरा, दोरी, लाल मिर्च पावडर, बॅटरी, कत्ती, हेल्मेट, कापडी पिवशी, सिमकार्ड, सॅग, शर्ट, पॅन्ट, नंबर प्लेट, क्रु डायव्हर, पान्हा , २ चोरीच्या मोटर सायकल(किंमत 1,00,000/- रुपय) अशा मुददेमालासह दरोडा टाकण्याचे उददेशाने एकत्र जमवुन पुर्व तयारी करुन घातक शस्त्रांसह मिळुन आले आहेत. घटना ठिकाणावरुन आरोपी 5) रमन मुन्ना यादव , 2) शंभु किस्टो यादव सर्व रा.नथीला, नयाटोला जुराबगंज, ता.जि.काठियार , राज्य बिहार पोलीस स्टेशन कोडा हे घटना ठिकाणावरुन अपाची मोटर सायककलवरुन पळुन गेले आहेत. आरोपींच्या विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर I 251/2024 भा.दं.वि.कलम 399,402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

            गुन्हयाचा तपास सहा.पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे राहुरी पोलीस स्टेशन हे करत आहेत. गुन्हयातील अटक आरोपींकडे करण्यात आलेल्या तपासामध्ये त्यांनी सोलापुर,औरंगाबाद,पुणे,अहमदनगर शहरामध्ये जबरी चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. खालील प्रमाणे ३ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. 

1)सोलापुर चावडी पो.स्टे.गुरनंबर I 339/2024 भादंवि कलम 392 , 34 प्रमाणे (8,00,000/- रुपये जबरी चोरी)

2)औरंगाबाद सिटी चौक पोलीस स्टेशन गुरनंबर I 66/2024 भादंवि कलम 392, 34 प्रमाणे (1,80,000/- रुपये जबरी चोरी)

3)पुणे लोहमार्ग पो.स्टे.गु.र.नंबर I 196/2024 भादंवि कलम 379 प्रमाणे (30,700 /- रुपये जबरी चोरी)

तसेच आरोपींवर दाखल असलेले गुन्हयांचा पुर्व अभिलेखाची तपासणी केली असता त्यांच्या विरुध्द एकूण 34 गुन्हे बिहार राज्यात व दिल्ली येथे दाखल आहेत. 

 

 

       सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर , डॉ.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वात सहा.पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पो.हे.कॉ.सुरज गायकवाड, पो.हे.कॉ.राहुल यादव, पो.हे.कॉ.विकास साळवे,पो.हे.कॉ. पाखरे पो.ना.प्रविण आहिरे, गोपनीय शिंदे , पो.ना.प्रविण बागुल, पो.कॉ.प्रमोद ढाकणे, पो.कॉ.नदिम शेख, पो.कॉ. अंकुश भोसले, पो.कॉ.सतिष कुऱ्हाडे , पो.कॉ.सचिन ताजणे, पो.कॉ.गोवर्धन कदम नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर यांनी केलेली आहे .