देवळाली प्रवरा येथे चोरटी वाहतूक करणाऱ्या वर राहुरी पोलीस सांकडून छापा एक आरोपीस जेरबंद

देवळाली प्रवरा येथे चोरटी वाहतूक करणाऱ्या वर राहुरी पोलीस सांकडून छापा एक आरोपीस जेरबंद

राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ  देवेंद्र शिंदे

दिनांक 19 /11/ 2025

 *देवळाली प्रवारा येथे चोरटी दारू विक्री करणाऱ्या वर छापे टाकून एक आरोपी राहुरी पोलिसांकडून जेरबंद* 

 राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील देवळाली प्रवरा छुप्या पद्धतीने गावठी हातभट्टीची दारू तयार करून तिची विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याबाबत माहिती पोनि. संजय ठेंगे यांना मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी देवळाली प्रवारा येथे आरोपी नामे दादा उर्फ रंगनाथ दिगंबर डुकरे याच्या ताब्यात गावठी हातभट्टीची दारू मोटर सायकल सह असा एकूण 36000/- हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.

            सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात पोउपनि. राजू जाधव, पोहेकॉ. सुरज गायकवाड , ,पोहेका हनुमान आव्हाड

, पोहेकॉ. राहुल यादव , पोकॉ. गणेश लिपणे, मपोकॉ. वंदना पवार यांच्या पथकाने केली.