बालाजी देडगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस
पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने व शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी देडगाव चे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन व आरती करण्यात आली. मोठ्या जय घोषात , फटाक्याच्या आतषबाजी मध्ये छत्रपती शिवरायांच्या घोषणा देण्यात आल्या.
हा शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवरायांनी सर्व रयतेला सोबत घेऊन केला होता. एक रयतेच स्वराज्य उभं राहावं रयतेला स्वच्छंद जगण्याचा अधिकार मिळावा .म्हणून सार्वभौम राज्याचा जयघोष केला. हा राज्याभिषेक अतिशय व्यापक व इतिहासातील महत्त्वाचा महत्त्वाचा प्रसंग होता. राज्याच्या सुरक्षितेसाठी अष्टपैलू, अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. हा सोहळा राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या उपस्थितीत व धार्मिक विधी करत हा सोहळा पार पडला होता .म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याने जनता सुखात नांदायला लागली. म्हणून शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण हिंदुस्थानात साजरा केला जातो. म्हणून बालाजी देडगाव येथे ही मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख रामानंद मुंगसे, भाजपा युवा मोर्चाचे आकाश चेडे , युवा नेते चांगदेव टकले,बळीराजा संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे ,पावन गणपतीचे अध्यक्ष संभाजी मुंगसे ,सोसायटीचे संचालक प्रमोद रक्ताटे, रमेश मुंगसे ,रमेश काजळे ,शिवाजी मुंगसे, दिनकर लाड ,रामचंद्र कदम, हवालदार पठाण, असलम भाई पठाण, दादासाहेब मुंगसे ,किरण म्हस्के, अतुल देवा तांदळे, अविनाश तांबे,हरिभाऊ बावधनकर,पै.संभाजी टकले, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष सर्व सदस्य व परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.