आरोग्य माता पवित्र तीर्थक्षेत्र मतमावली यात्रा अमृत महोत्सव हरेगांव - 2023 यात्रा पुर्व शनिवार नोव्हेना दि. 1जुलै 2023 पासून साजरी करण्यात येते आहे.

आरोग्य माता पवित्र तीर्थक्षेत्र मतमावली यात्रा अमृत महोत्सव हरेगांव  - 2023  यात्रा पुर्व शनिवार नोव्हेना दि. 1जुलै 2023 पासून साजरी करण्यात येते आहे.

महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर आरोग्य माता पवित्र तीर्थक्षेत्र

म्हणून प्रसिद्ध असलेल्या मतमाऊली यात्रा अमृत महोत्सव हरेगांव  - 2023  मतमाऊली यात्रा पुर्व नऊ शनिवार नोव्हेना  दि. १ जुलै २०२३ पासून साजरी करण्यात येते. आहे. यासाठी संत फ्रान्सिस झेवियर चर्च राहाता व नित्य साहाय्यक माता चर्च अशोकनगर  धर्मग्राम यांनी पहीले नोव्हेना पुष्प गुफिले . मिसाचे प्रमुख याजक रेव्ह.फा.गिल्बट डिनीस (प्रमुख धर्मगुरू राहाता ) प्रवचनकार रेव्ह.फा.मुक्ती प्रसाद (प्रमुख धर्मगुरु अशोकनगर )यांनी माळेचे रहस्य विविध उदाहरणे व चार खंडाप्रमाणे खुप छान प्रकारे सांगितले . समवेत राहाता धर्मग्रामाचे साहाय्यक धर्मगुरू रेव्ह फा.आनंद बोधक , औरंगाबाद येथील संत जॉन सुवार्तिक चर्च सिडको धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरु रेव्ह.फा.मार्कस रुपटक्के (एमएसएफएस) हरेगांव धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फा. डॉमिनिक रोझारीओ, रेव्ह.फा. रिचर्ड आंथोनी , रेव्ह. फा.सचिन मन्तोडे यांनी सर्वांसाठी मिसा अर्पण केला. यावेळी आसपासच्या गावातून पुष्कळ भाविक  या भक्तीत सहभागी झाले....... Delhi91.com bps livenews   Reporter... Prakash Nikale. Shrirampur.