श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ढोरजळगाव येथे इ . 5 वी च्या नविन विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत .

श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ढोरजळगाव येथे इ . 5 वी च्या नविन विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत .

श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ढोरजळगाव ता शेवगाव येथे नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत .

 

आव्हाणे बु :- इ.५वी नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताश्याच्या गजरात स्वागत करण्यात आले व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ढोरजळगाव- शे च्या सरपंच सौ. रागिणीताई लांडे व ढोरजळगाव-ने च्या सरपंच सौ. मंगलताई कराड उपस्थित होत्या.

        कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यालयाचे प्राचार्य श्री. संजयजी चेमटे यांनी नवागताचे स्वागत करताना स्वतःचे विद्यार्थीदशेतले अनुभव सांगितले. विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या गुणवंतांचा इतिहास सांगितला. गुणवत्तेचा आलेख आणखी उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली. हसा, खेळा पण शिस्त पाळा, स्वत:ची काळजी घ्या. वेळेला महत्त्व द्या‌.अभ्यास करा असे सांगितले.

       शिक्षक मनोगतामध्ये राऊत के एल यांनी नवागताचे स्वागत करताना आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे कला-कौशल्य शोधून त्यांचा विकास केला जातो यासाठी विद्यालयात विविध उपक्रम राबवले जातात असे सांगितले.

 

        या कार्यक्रमास ग्रा पं सदस्य श्री देविदास गि-हे,पत्रकार श्री दिपक खोसे व पत्रकार श्री ज्ञानेश्वर फसले यांचेसह प्राचार्य श्री.संजय चेमटे ,पर्यवेक्षक श्री. जायभाये एस ए,विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम. वाहूरवाघ एस.एस.यांनी केले तर सुत्रसंचालन श्रीम. फलके आर. आर. यांनी केले.ज्येष्ठ शिक्षक श्री मगर बी. पी. यांनी उपस्थितांचे आभार मानले.