आज राहुरी चे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या तडकाफडकी बदली आदेश रद्द करणे साठी सर्व पक्षीयांचे रस्ता रोको आंन्दोलन.

आज राहुरी चे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या तडकाफडकी बदली आदेश रद्द करणे साठी सर्व पक्षीयांचे रस्ता रोको आंन्दोलन.

अहमदनगर ता.राहुरी येथाल पोलिस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांच्या तडका फडकी बदलीच्या आदेशामुळे राहूरी तालुक्यातील जनता.विद्यार्थी.पालक. तसेच सर्व पक्षीयांचे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर रस्ता रोको आंदोलन केले आहे.

या आन्दोलनात शिवसेनेचे अहमदनगर जिल्हा प्रमुख श्री खेवरे.सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव.समता परीषदेचे श्री प्रशांत शिंदे.आर पी आय चे जिल्हा प्रमुख श्री सुरेंद्र थोरात.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्री रवि मोरे.आर पी आय महिला आघाडी.मा.खासदार बापू साहेब तनपुरे.वकिल संघटणा चाचा तनपुरे. वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष पिंटु नाना साळवे.आमदार श्री प्राजक्त तनपुरे.यांसह अनेक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे 

यामध्ये प्रमुख मागणी राहुरीचे पोलिस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांचेवर जी कार्यवाही प्रशासनाने केली आहे ती त्वरित मागे घेऊन श्री दराडे यांना दोष मुक्त करून आहे तीथेच रुजु करून घ्यावे

यांचे मुळे तालुक्यातील अनेक गुन्हेगारांना चपराक बसली आहे असे मत जनतेतून होत आहे.

यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा व जनता या रस्ता रोकोला उपस्थित होती.

शेवटी जर दराडे यांची बदली आदेश रद्द केले नाही तर वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष पिंटु नाना साळवे यांनी मंत्रालय मुंबई येथे अमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले.