शिंगवे तुकाई परिसरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या जनावरांची सुटका करून जेऊरच्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल .

शिंगवे तुकाई परिसरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या जनावरांची सुटका करून जेऊरच्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल .

खेडले परमानंद//वार्ताहर

नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई येथे वैभवदत्त लॉन्स समोर कत्तलीसाठी काही जनावरे क्रूरतेने डांबून ठेवल्याची माहिती सोनई पोलीस स्टेशनला कळताच त्यांनी तात्काळ दखल घेऊन जनावरांची सुटका करून आरोपींवर गुन्हा दाखल करत आठ लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

 

          सदर घटनेची हकीकत अशी की शिंगवे तुकाई परिसरातील वैभव दत्ता लॉन्स येथे तेरा म्हशी (किंमत अंदाजे 3,25,000 रु . )कत्तलीच्या उद्देशाने अतिशय क्रुरपणे या जनावरांना बांधण्यात आले होते .तसेच या जनावरांना कुठल्याही प्रकारे अन्नपाण्याची व्यवस्था न करता त्यांना डांबून ठेवण्यात आले होते .महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत व जनारांना कत्तलीसाठी घेऊन जाण्याच्या उद्देशाने डांबून ठेवल्या प्रकरणी वाहन चालक नितीन पाटोळे तसेच साहिल शेख दोघे राहणार बायजाबाई जेऊर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे .वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा टाटा कंपनीचा 1109 वाहन क्रमांक MH 05 AM 2035 (अंदाजे किंमत 5,00,000 रु ) जप्त करण्यात आले आहे .

 

         गेल्या काही महिन्यापूर्वी बायजाबाई जेऊर येथील काही व्यापाऱ्यांनी मुळा नगर परिसरातील अनेक जनावरे मुळा नगर येथील दोन आरोपींच्या मध्यस्थीने गायब केली होती .त्यांना रंगे हात पकडल्यानंतरत् त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली होती व मुळानगर येथील तरुणांनी त्यांना राहुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते .

 

             राहुरीतालुक्यातील मुळा नगर येथील जनावरे घेऊन जाणारे आरोपी व शिंगवे तुकाई येथील जनावरे घेऊन जाणारे आरोपी एकच असेल तरत्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे .सदर घटनेचा पुढील तपास सोनई पोलीस स्टेशनचे पो.ना . तुपे हे करत आहे.