नदी पात्रात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. परिसरात शोककळा.

नदी पात्रात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. परिसरात शोककळा.

प्रतिनिधी :-संभाजी शिंदे खेडले परमानंंद

नेवासा- तालुक्यातील सुरेगाव गंगा येथील श्रीकांत गणेश शिंदे (वय१८) हा युवक सकाळी ८ वाजेच्या दरम्यान गोदावरी नदीपात्रात आंघोळीसाठी मित्रांसमवेत गेला होता मात्र पोहत असताना नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. सदर घटनेची खबर अंकुश ज्ञानदेव शिंदे यांनी नेवासा पोलीस स्टेशनला दिली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात हे.कॉ. बबन तमनर ,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा हे घटनास्थळी हजर झाले त्यानंतर परिसरातील युवकांनी बराच वेळ नदीपात्रात शोध घेतला असता सदर युवकाचा शोध लागला नाही त्यानंतर नेवासा पोलीस स्टेशनने शहर टाकळी ता. शेवगाव येथील गोताखोर पथकास पाचारण केले असता त्यांनी ऑक्सीजन सिलेंडर च्या साह्याने नदीपात्राच्या तळाशी शोध घेतला असता या युवकाचा मृतदेह या पथकाला ४.४५ वाजेच्या सुमारास आढळून आला सदर युवकाचा मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदणासाठी नेण्यात आला असून पुढील तपास हे.कॉ.बबन तमनर हे करत आहेत.या युवकाचे बारामती येथे अभियांत्रिकी विद्यालयात शिक्षण सुरू होते तर सुरेगाव गंगा येथील माजी सरपंच नरसिंगराव शिंदे यांचा तो नातू होता.