संगमनेर तालुक्यातील पठारी भागात खांबे गावांमध्ये 54 तरुणांचे रक्तदान ...

संगमनेर तालुक्यातील पठारी भागात खांबे गावांमध्ये 54 तरुणांचे रक्तदान ...

*संगमनेर तालुक्यातील पठारी भागात खांबे गावांमध्ये 54 तरुणांचे रक्तदान* ...

खांबे, तालुका-संगमनेर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान यांच्यावतीने श्री निवृत्ती ठकाजी इले प्राचार्य नेमली स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय खांबे, संचालक सहकार सोसायटी खांबे, माननीय उपसंद सरपंच ग्रामपंचायत खांबे, उपाध्यक्ष - अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघ तसेच खांबे गावचे युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते श्री.गोरख विठ्ठल दातीर या दोन्हींच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अश्र्वी प्रसिद्ध डॉक्टर अभिजीत गायकवाड (एम.डी.आयुर्वेद) यांनी रक्तदान याविषयी जनजागृती वर मार्गदर्शन केले . संगमनेर हा अत्यंत दुर्गम व पठारी भाग आहे या ठिकाणी कायम दुष्काळाला सामोरे जावे लागते अशा भागामध्ये सुद्धा रक्तदान शिबिरास तरुण रक्तदात्यांकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला यामध्ये एकूण 54 रक्तदात्यांनी निसंकोचपणे रक्तदान केले.

कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अर्पण रक्तपेढी संगमनेर यांच्या सर्व डॉक्टर व कर्मचारी वर्गांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान च्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या दात्यास केशर आंब्याचे एक रोप देऊन अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम ग्रामीण भागातील सामाजिक कार्याला एक दिशा दर्षक ठरला त्यामुळे पठार भागावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. या सामजिक कार्याबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वांचे ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.