आबासाहेब काकडे माध्यमिक विद्यालय शेवगावचे एसएससी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश ,गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न .

आबासाहेब काकडे माध्यमिक विद्यालय शेवगावचे एसएससी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश ,गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न .

आबासाहेब काकडे माध्यमिक विद्यालय शेवगावचे एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत घवघवीत यश, गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न .

                                

       आव्हाणे बु :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला असून शेवगाव तालुक्यातील आबासाहेब काकडे विद्यालयाचा निकाल ९७.५५इतका लागला आहे .दहावी बोर्ड परीक्षेसाठी एकूण ४०९ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २२८ विद्यार्थी विशेष प्राविण्यसह तर १२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये तर ४४ विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सेमी माध्यमाचा निकाल हा १००% टक्के लागला असून कु. ज्ञानेश्वरी सचिन गोलांडे हिने ९७ % गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला. कु. रिया रमेश राठोड हिने ९५.८० % गुण मिळवत द्वितीय तर कु. तनिष्का सुभाष खर्चन हिने ९५.६० % गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.मराठी माध्यमाचा निकाल ९३.८६% लागला असून त्यामध्ये कु. साक्षी अशोक शेंबडे हिने ८८.४० % गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला .चि. शिवम जालिंदर कोहोक याने ८४.६० % गुण मिळवत द्वितीय तर कु. अनुष्का धोंडीराम काकडे हिने ८४.२० % गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला ९०% च्या पुढे एकूण ३९विद्यार्थ्यांनी गुण मिळवले यशाचा आलेख वर्षानुवर्ष वाढतच आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अॅड डॉ. विद्याधर काकडे साहेब, जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंह भैय्या काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.लक्ष्मणराव बिटाळ, विद्यालयाचे प्राचार्य श्री.संजय चेमटे, उपमुख्याध्यापिका सौ.मंदाकिनी भालसिंग,उपप्राचार्या श्रीम.रूपा खेडकर, पर्यवेक्षिका श्रीम. पुष्पलता गरुड,पर्यवेक्षक श्री.लक्ष्मण गाडे, श्री.शिवाजी पोटभरे,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच पालकांनी अभिनंदन केले. आज या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा विद्यालयामध्ये संपन्न झाला .यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय चेमटे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य श्री संजय चेमटे म्हणाले की आपले विद्यालय हे दीनदलित, गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांचे विद्यालय आहे. या विद्यालयात असणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांनी असामान्य अशी कामगिरी केली असे ते म्हणाले. यावेळी पालक श्री. डाॅ.सुभाष खर्चन(सर), श्री. रमेश राठोड यांनी तर गुणवंत विद्यार्थिनी कु.ज्ञानेश्वरी गोलांडे कु.साक्षी शेंबडे चि.शिवम कोहोक संस्थेप्रति व विद्यालयाप्रती ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. शीला धिंदळे यांनी केले प्रास्ताविक पर्यवेक्षिका श्रीमती पुष्पलता गरुड यांनी केले तर आभार श्री अविनाश भागवत यांनी मानले.