माननीय छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रीमंडळ विस्तार विधी. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. मंत्रीमंडळ विस्तार शपथविधी सोहळा.
राजभवन, मुंबई ( प्रतिनिधी ) :- माननीय छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील ,जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, उद्योग ,मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध व्यवसाय विकास विभाग मंत्री अतुल सावे, क्रिडा युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मंत्री भुजबळ यांचे कुटुंबिय उपस्थित होते. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी या सोहळ्याचे संचलन केले.