आपणच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आहात - माजी संचालक डॉ. डी.सी. पटवर्धन.
*राहुरी विद्यापीठ, दि. 12 डिसेंबर, 2024*
आई-वडील आपले खरे मित्र असून त्यांच्याबद्दल आपण नेहमी कृतज्ञता बाळगावी. आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करा आणि ध्येयाच्या दिशाने वाटचाल करा. या वयातच आपल्याला आपले प्राधान्यक्रम कळाले पाहिजे. यामध्ये पहिले आपले शरीर व मानसीक स्वास्त, दुसरे आपले कुटुंब, तीसरे आपले करियर व चौथा समाज. जीवनात कष्टाशिवाय पर्यान नाही फक्त कष्ट हे योग्य दिशेने झाले पाहिजे तरच तुम्हाला सुवर्णसंधी उपलब्ध होतील. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहात असे प्रतिपादन सांगली येथील नंदादिप आय हॉस्पीटलचे संस्थापक आणि मुंबई येथील जीवनविद्या विषयाचे माजी संचालक डॉ. डी.सी. पटवर्धन यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथील पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी मुल्यशिक्षण या विषयावर व्याख्यानाचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शन करतांना डॉ. डी.सी. पटवर्धन बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबाडे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष सासाणे उपस्थित होते. याप्रसंगी कृषि तंत्र शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुरेश बोडखे, सख्याशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विलास वाणी, विद्याथी कल्याण अधिकारी डॉ. व्ही.एस. पाटील, तांत्रिक अधिकारी डॉ. सुनील भणगे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहय्यक कुलसचिव श्री. किरण शेळके उपस्थित होते.
स्वागत, प्रास्ताविक व अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. साताप्पा खरबडे म्हणाले की सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांवर ताण येत आहे. तसेच या डिजीटल युगामध्ये विविध माहितींचा घडीमार होऊन विद्यार्थी गोंधळात पडत आहे. या अनुशंगाने मुल्यशिक्षण आणि विद्यार्थ्यांचे मानसीक स्वाथ्य याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. मानसीक स्वाथ्य चांगले असेल तर विद्यार्थी अपयश पचवून यशाची पायरी चढु शकतात. या व्याख्यानात प्राध्यापक, शास्त्रज्ञ, पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी कृषि महाविद्यालय, पुणे, धुळे, कोल्हापूर, कराड, मुक्ताईनगर येथील सहयोगी अधिष्ठाता, प्राध्यापक व विद्यार्थी ऑनलाईन या व्याख्यानात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रकाश लोखंडे यांनी केले तर आभार डॉ. सुनील भणगे यांनी मालने.