दुष्काळग्रस्त पारनेर तालुक्याला जलसंधारणासाठी मंत्री गडाख यांच्या कडून सर्वाधिक निधी उपलब्ध.

दुष्काळग्रस्त पारनेर तालुक्याला जलसंधारणासाठी मंत्री गडाख यांच्या कडून सर्वाधिक निधी उपलब्ध.

शिवसेना पक्षाच्या नेत्यांच्या आग्रहाखातर पारनेर तालुक्यातील पाझर तलाव दुरुस्ती साठी जिल्ह्यातील सर्वाधिक निधी हा पारनेर तालुक्यात दिला असून यापुढेही काळामध्ये पारनेर तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या मोर्चेबांधणी साठी प्रयत्न करणार असून तालुक्याला निधी कमी पडू देणार नाही असे मत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी व्यक्त केले आहे

पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मंत्री शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आहे यावेळी ते बोलत होते

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी होते

या कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते , जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, सभापती गणेश शेळके पंचायत समिती सदस्य श्रीकांत पठारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.