*राहुरी तालुक्यातील मौजे एका गावातील दोघांवर पोस्को व ॲट्रोसिटी गुन्हा दाखल.*

*राहुरी तालुक्यातील मौजे एका गावातील दोघांवर पोस्को व ॲट्रोसिटी गुन्हा दाखल.*

राहुरी तालुक्यातील मौजे एका गावातील मागसवगीय कुटुंबात सहा ते आठ जण रहात आहे फीर्यादी वडिल यांच्या फीर्यादीवरून त्याच गावात रहात असलेल्या आरोपी नंबर एका ने आरोपी नंबर दोन याच्यासह त्याच्या घरी गेले व मागासवगीय कुटुंबातील फीर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करून धमकावून पोलीस माझे काही वाकडे करणार नाही असे म्हणत फीर्यादीच्या मुलीस आरोपी नंबर एक ने जोर जबरदस्ती ने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून म्हटले तु जर केस मागे घेतली नाही तर तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन असे म्हणत आरोपी नंबर दोनच्या अंगावर अल्पवयीन मागासवगीय मुलीस लोटून देऊन आरोपी नंबर एक म्हणाला की आरे हे तर महारडे आहेत

हे महारडे नसते आपल्या जातीचे असते तर तुझे त्या अल्पवयीन मुली बरोबर तुझे लग्न लावून दिले असते असा फीर्यादी वडिल यांच्या समोर घडलेला सर्व प्रकार राहुरी पोलीस ठाणे येथे जाऊन सांगितला असता राहुरी पोलीस ठाणेचे पो.नि.संजय ठेंगे यांनी या गुन्ह्याची दखल घेऊन आरोपी एक व दोन यांच्यावर भारतीय न्यायसंहिता ( बी एन एस ),२०२३ चे कलम ७४,७५,७८,३५१(२),३५२ बालकांचे लैगीक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८,१२ अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक)अधिनियम १९८९ चे कलम ३(२)(va),३(१)(w)(i)(ii),३(१)(r)(s) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तरी पुढील तपास मा.उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय ठेंगे स.पो.नि.सुदाम शिरसाठ हे करत आहेत.