सावकाराच्या त्रासाला कंटाळून शंकर होले यांची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
राहुरी ता प्रती - डॉ देवेंद्र शिंदे

सावकाने दिलेल्या पैशाची परतफेड करून सुध्दा २ लाख रुपए व्याजाचे पैशांची मागणी करत शंकर होले यांना सावकार महिलांनी मानसिक त्रास दिला. त्यांच्या त्रासाला कंटाळून शंकर होले यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली.
गणेश शंकर होले, वय २७ वर्षे, रा. सात्रळ, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, गणेश होले यांचे वडील शंकर बाबुराव होले, वय ५२ वर्षे, यांनी त्यांचे वैयक्तिक कामाकरीता आरोपी सविता पोटे हिच्याकडुन काही दिवसांपुर्वी व्याजाने पैसे घेतले होते. त्यानंतर शंकर होले यांनी वेळोवेळी आरोपी महिलेला व्याजासह पूर्ण पैसे दिले. तसेच गणेश होले व त्यांचे वडील शंकर होले यांनी गणेश थोरात यांच्या पत्नीकडुन हाथ उसने ५ म्हणून लाख लाख रूपये घेतले होते. पैसे घेताना गणेश आप्पासाहेब थोरात यांना दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी दोन चेक देऊन उसनवार पावतीची नोटरी करून दिली होती. आरोपी सावकार महिलांकडून घेतलेले उसने पैसे होले यांनी मुदतीत परत केले. होले यांनी दिलेले चेक परत मागीतले. तेव्हा सावकार महिला शंकर होले यांना म्हणाल्या कि, आम्ही तुमचे कोरे चेक परत देणार नाहीत. तुम्ही आमचे पैसे व्याजासह परत करा. शंकर होले व सावकार महिलांचा कोणताही पैसे देणे घेणेचा व्यवहार राहिलेला नसताना दोन्ही सावकार महिला ३१ डिसेंबर २०२५ रोजी होले यांच्या घरी गेल्या व म्हणाल्या की तुमच्याकडे आमचे पैसे घेणे बाकी आहे. ते आम्हाला आजच्या आज परत पाहिजे आहे. असे म्हणुन अर्वोच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करून निघून गेल्या. त्यानंतर सावकार महिलांनी दि. ३ जानेवारी रोजी शंकर होले यांना फोन करून वेळोवेळी पैशाची मागणी केली. शंकर होले हे पैशाचे तगाद्यामुळे तणावात येवुन त्यांनी दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी विषारी औषध प्राशन केले. त्यावेळी त्यांना लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सावकार महिलांनी रुग्णालयात जाऊन आमचे नाव कोठेही घेऊ नका. आमचेकडे भरपुर मुले असुन तुमचे जगणे मुशकिल करून टाकु, अशा प्रकारे दमदाटी करून तेथुन निघुन गेल्या. त्यानंतर दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शंकर बाबुराव होले यांचेवर रुग्णालयात औषधउपचार चालु असताना ते मयत झाले.
घटने नंतर मयत शंकर होले यांचा मुलगा गणेश शंकर होले यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आरोपी सविता ज्ञानेश्वर पोटे, रा. पाटा जवळ, श्रीरामपूर व गणेश आप्पासाहेब थोरात यांची पत्नी, रा. घुलेवाडी, संगमनेर, या दोन महिला सावकारांवर गुन्हा रजि. नं. ५७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५२, ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढिल तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.








