पंढरपूर येथे पूजेचे मानकरी ठरलेले काळे कुटुंबीयांचा बालाजी देडगाव येथे भव्य नागरी सन्मान.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते शासकीय पूजेबरोबर नेवासा तालुक्याचे भूमिपुत्र वाकडी गावाचे श्री .भाऊसाहेब मोहनिराज काळे व सौ मंगलबाई भाऊसाहेब काळे यांना पूजेचा मान मिळाला म्हणून ग्रामस्थच्या व बालाजी देवस्थान ट्रस्ट च्या वतीने भव्य नागरि सत्कार करण्यात आला.
एसटी बसस्थानक ते नव्या पेटीतून ढोल - ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजी मध्ये त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली . काळे कुटुंबीयांनी गावातील महादेव मंदिर, संत रोहिदास मंदिर, हनुमान मंदिर या ठिकाणी भेट देत बालाजी मंदिर येथे सन्मान सोहळा घेण्यात आला.
या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गावच वैभव गाथामूर्ती ह. भ. प. सुखदेव महाराज होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा तालुक्याचे महंत ,गुरुवर्य सुनिलगिरी महाराज महाराज हे लाभले.
यावेळी बालाजी देवस्थान, ग्रामपंचायत सोसायटी, संत रोहिदास देवस्थान व विविध संघटना शाखेच्या वतीने व वैयक्तिक या काळे दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रगतशील बागायत शेतकरी चद्रभान कदम यांनी केले. तर महंत सुनीलगिरीजी महाराज, ह. भ. प. गणेश महाराज काळे व भाऊसाहेब काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार ज्येष्ट पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी मानले.
यावेळी गावातील सरपंच ,उपसरपंच ,सदस्य ,सोसायटीचे चेअरमन, व्हाई चेअरमन, संचालक, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष, हरिपाठ गृप सर्व विश्वस्त ,विविध शाखेचे संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
.