राहुरी तालुका अंतर्गत फॉरेस्ट ऑफिसमधे च वृक्षतोड आणि विक्री झाल्याचा प्रकार आला उघडीकस

राहुरी तालुका अंतर्गत फॉरेस्ट ऑफिसमधे च वृक्षतोड आणि विक्री झाल्याचा प्रकार आला उघडीकस
राहुरी तालुका अंतर्गत फॉरेस्ट ऑफिसमधे च वृक्षतोड आणि विक्री झाल्याचा प्रकार आला उघडीकस

*राहुरी तालुका अंतर्गत फॉरेस्ट ऑफिसमध्येच वृक्षतोड आणि विक्री झाल्याचा प्रकार आला उघडकीस* 

राहुरी ता प्रती डॉ देवेंद्र शिंदे

राहुरी तालुक्यातील डिग्रस गावातील नर्सरी येथे वनविभागातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

राहुरी,तालुक्यातील डिग्रस गावातील नर्सरी येथील रोपवाटिका बारागाव नांदूर येथील वनसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी असलेल्या राहुरी फॉरेस्ट ऑफिसमध्येच अनधिकृत वृक्षतोड आणि विक्रीचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याची माहिती समोर आली आहे. वनविभागाच्या हद्दीतच होत असलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑफिस परिसरातील बाभाळ पिंपळ. आणि काही शो च्या झाडांची तोड करून त्यांची लाकूड विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकरणात कोणाच्या निर्देशाने किंवा संमतीने हे सर्व घडले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. मात्र, वनसंरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठिकाणीच असे प्रकार घडत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या विषयी वनविभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

पर्यावरण तज्ञांच्या मते, वनसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या कार्यालयातच झाडांची तोड होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, यामुळे लोकांचा विश्वास डळमळीत होऊ शकतो.त्याचबरोबर इतर ठिकाणाहून पकडून आणलेले बिबटे हे देखील त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत त्यांची अवस्था देखील दयनीय झाल्याचे दिसुन आले आहे 

या घटनेमुळे राहुरी फॉरेस्ट ऑफिसचे कामकाज आणि जबाबदारी पुन्हा प्रकाशझोतात आली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.