गौतम बुद्ध यांच्या तत्वज्ञानाचे आचरण केले तर माणसामध्ये परिवर्तन घडून येणे शक्य आहे... प्रा. अलका जाधव.

गौतम बुद्ध यांच्या तत्वज्ञानाचे आचरण केले तर माणसामध्ये  परिवर्तन  घडून येणे शक्य आहे... प्रा. अलका जाधव.

पळशी येथे बौद्ध पौर्णिमे निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, प्रज्ञासूर्य महात्मा फुले, विरमाता अहिल्यादेवी होळकर,आदिवासी नेते बिरसा मुंडा, महानायक तंट्या भिल्ल या महापुरुषांना व वीर मातांना अभिवादन करण्यासाठी व बौद्ध जयंती साजरी करण्यात आली.

सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. बौद्धचार्य नितीन पाडळे यांनी मानवंदना घेऊन विधिवात प्रार्थना केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पळशी गावचे सरपंच अप्पासाहेब शिंदे व प्रमुख व्याख्याता प्रा. अलका जाधव/पवार (दादासाहेब रुपवते जुनिअर कॉलेज) ह्या होत्या.श्रवस्ती बुद्धविहार पळशी यांचे तर्फे उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व निवडून आलेले सोसायटी सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.

प्रा अलका मॅडम यांनी आपल्या भाषणातून गौतम बुद्ध यांचा सर्व जीवन प्रवास कथन केला त्यांचे बालपण, तारुण्यपन, त्यांचे वैवाहिक जीवन, त्यांचे झालेले परिवर्तन, त्यांना प्राप्त झालेले दिव्यज्ञान, त्यांचे कार्य व तत्वज्ञान स्पष्ट केले त्यांचे चार आर्यसत्य व अष्टांगमार्ग यावर त्यांनी विशेष विस्तृत दाखले देऊन उपस्तित लोकांची मने जिंकली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन नंदू साळवे यांनी केले.सर्व उपस्थित लोकांसाठी जेवणाची व्यवस्था सुंदर केली होती.

कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती भाऊ सरोदे, अंबरनाथ वाळुंज, अशोक साळवे, मारुती साळवे, अशोक तांबे, सखाराम साळवे, देवानंद साळवे, संकलेस मोधावे, नितीन साळवे, संतोष साळवे, बाबू मोधावे, मारुती साळे, हिरामण साळवे, गौतम साळवे,सुनील साळवे, डॉ गबाजी गुंजाळ, राजू बोलबिले शरद साळवे, निलेश साळवे,रामदास साळवे, नितीन पवार ग्रामसेवक आदी उपस्थित होते.