बेलवंडी पोलिसांचा गव्हाणवाडी येथील दोन वेश्याव्यवसाय करणाऱ्या लॉजवर छापा,सहा महिलांची सुटका त्यात एक परप्रांतिय महिलेचा समावेश .

बेलवंडी पोलिसांचा गव्हाणवाडी येथील दोन वेश्याव्यवसाय करणाऱ्या लॉजवर छापा,सहा महिलांची सुटका त्यात एक परप्रांतिय महिलेचा समावेश .

बेलवंडी पोलिसांचा गव्हाणवाडी येथील दोन वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉज वर छापा, सहा महिलांची सुटका (पैकी एक परप्रांतीय)

Delhi91 News ची खास बातमी .

            दिनांक 27 12 2013 रोजी बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की , बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील नगर पुणे रोडवर गव्हाणवाडी येथे सोनल गार्डन लॉज येथे आरोपी-बालाजी चंदन नरहरी रा.चादुरेवाडी हल्ली राहणार गव्हाणवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर व अमृत लॉज येथे आरोपी रामलखन भैय्यालाल वर्मा रा.वार्ड नं.13 मेमरी खुर्द पो.रघुराजगढ ता.मनगवा जि. गवा राज्य-मध्यप्रदेश हल्ली राहणार गव्हाणवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर स्वतःच्या फायद्या करता वेगवेगळ्या मुली/ महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत आहे.

 

             सदर माहितीची शहानिशा करून रेड करण्याकरिता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शासकीय पंच बोलावून तसेच कर्जत उप विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय विवेकानंद वाखारे साहेब यांना सदर बाबत माहिती देऊन त्यांचे उपस्थितीत बेलवंडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांचे दोन पथक तयार करून प्राप्त माहितीनुसार पंचासोबत डमी गिऱ्हाईक पाठवून छापा टाकून कारवाई केली असता मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे कारवाई केली असता आरोपी-1)बालाजी चंदन नरहरी रा.चादुरेवाडी हल्ली राहणार गव्हाणवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर हा सोनं गार्डन लॉज येथे तीन महिलांच्या साह्याने वेश्या व्यवसाय करत असताना मिळून आल्याने त्यास पंचा समक्ष रंगेहात पकडले.

 

 

              तसेच आरोपी रामलखन भैय्यालाल वर्मा रा.वार्ड नं.13 मेमरी खुर्द पो.रघुराजगढ ता.मनगवा जि. गवा राज्य-मध्यप्रदेश हल्ली राहणार गव्हाणवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर हा अमृत लॉज येथे तीन महिलांच्या साह्याने वेश्याव्यवसाय करताना मिळून आल्याने कारवाई करण्यात आली. एकूण सहा पीडित महिलांची सुटका करुन दोन स्वतंत्र गुन्हे PITA ACT कलम 4,5 प्रमाणे दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे करत आहे.

 

         सदरची कारवाई पोलीस अधीक्षक माननीय राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक माननीय प्रशांत खैरे , उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय विवेकानंद वाखारे साहेब यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पथक क्रमांक 1)पोलीस उपनिरीक्षक गाजरे,पो.हे.कॉ. नंदकुमार पठारे, भाउसाहेब यमगर,लेखनिक कैलास शिपनकर, विनोद पवार,सतिष शिंदे, संदिप दिवटे, रवी जाधव, विकास सोनवणे, मपोना सुरेखा वलवे,अविंदा जाधव , यमुना बजंगे,  पथक क्रमांक 2) पोलीस उपनिरीक्षक चाटे, स. फौ शिंदे, स.फौ.मारुती कोळपे, पो हवा झुंजार, हसन शेख, खेडकर,भाऊ शिंदे, जायकर,पोना गांगर्डे ,जावेद शेख, पो कॉ इरफान शेख (SDPO Office), संजय गुंड (SDPO Office), भांडवलकर, मपोशी विद्या धावडे अश्विनी शिंदे ,मपोना काळे यांचे पथकाने केली.बेलवंडी पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना आव्हान करण्यात येते की अशाप्रकारे वेश्याव्यवसाय बाबत आपणास काही माहिती असल्यास पोलीस स्टेशनला कळवावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल.