कामगारांच्या हितासाठी संघर्ष करावा लागेल : माजी मंत्री जयंत पाटील अहिल्यानगर (वार्ताहर)

कामगारांच्या हितासाठी संघर्ष करावा लागेल : माजी मंत्री जयंत पाटील   अहिल्यानगर (वार्ताहर)

कामगारांच्या हितासाठी संघर्ष करावा लागेल : माजी मंत्री जयंत पाटील

 अहिल्यानगर (वार्ताहर)

कामगारांच हित जोपासण्यासाठी त्या चार कायद्यात बदल आवश्यक आहे. अन्यथा कारखानदारांच्या मर्जीने संघटना तयार होईल.त्यासाठी व्यापक स्वरूपात चळवळ उभी करावी लागेल. आम्ही सर्व कामगारांच्या पाठीशी आहोत..असे मत माजी मंत्री आमदार जयवंतराव पाटील यांनी व्यक्त केले.

   शिर्डी येथे साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आमदार पाटील बोलत होते.

पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की,ज्यांना आपण निवडून दिले. त्या आमदार व खासदारांनी सभागृहात कायद्यावर बोलणं गरजेचे असताना ते दुसऱ्याच विषयावर जास्त बोलतात.भारतीय लोकशाहीचं दुर्दैव आहे. व्याख्याते संजय वढावकर यांनी जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांची आता सर्वांना काळजी आहे. कामगारांच्या हक्काच्या संरक्षणासाठी पुढच्या काळामध्ये साखर कामगार चळवळ अधिक प्रभावी करावी लागेल.कोणत्याही पक्षाचा आमदार असो त्याला ह्या कायद्याविषयी समजावून सांगा.त्यासाठी एक मोहीम हाती घ्या.एक नोट तयार करून अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या माध्यमातून सर्व खासदारांना पोहचवा...असे आवाहन माजी मंत्री जयवंतराव पाटील यांनी केले.

दुपारच्या सत्रात कारखानदारी आणि कामगारांची अवस्था याविषयी संजय वढावकर व नवीन श्रम संहिता व कामगारांची घ्यावयाची दक्षता याविषयी ॲड.एपी चौगुले यांनी मार्गदर्शन केले. रास्त मागण्या असतील तर सरकारला विचारच करावा लागतो. हे दिल्लीतील तरुणांच्या आंदोलनावरून आपणा सर्वांना कळले आहे.कामगार विरोधी चार कायदे लागू होवू नये. यासाठी लढा आवश्यक असून त्यासाठी एकजुटीने लढा उभारू असे आवाहन संजय वढावकर यांनी केले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित सर्वांचे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस रावसाहेब पाटील यांनी स्वागत केले. प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी केले. याप्रसंगी सोमेश्वर सहकारी कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप,संजय वढावकर आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, अविनाश आपटे 

, उपाध्यक्ष युवराज रणवरे, उपाध्यक्ष अशोक बिराजदार, उपाध्यक्ष डी एम निमसे, उपाध्यक्ष नितीन बेनकर, उपाध्यक्ष प्रदीप शिंदे,कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, सचिव राजेंद्र तावरे, सचिव सयाजी कदम, सचिव संजय मोरबाळे, सचिव संजय पाटील व सचिव योगेश हंबीर, अशोकराव पवार आदी उपस्थित होते..

उपस्थित सर्वांचे आभार महाराष्ट्र राज्य कामगार प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष डी.एम निमसे यांनी मानले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश हापसे व चंद्रशेखर कलगी यांनी केले.