शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांच्या पाठपुराव्याला यश,नगरपरिषदेसमोरील उपोषण सत्यजित कदम यांच्या मदतीने सुटले .

शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांच्या पाठपुराव्याला यश,नगरपरिषदेसमोरील उपोषण सत्यजित कदम यांच्या मदतीने सुटले .

अखेर राहुरी नगर परिषदेसमोरील उपोषण सत्यजित कदम यांच्या मध्यस्थीने सुटले .शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांच्या पाठपुराव्याला यश

              राहुरी नगर परिषदे समोर अनुकंपा नोकर भरती प्रक्रियेत गोंधळ केल्याच्या आरोपावरून अनुकंपा लाभार्थी कैलास विठ्ठल शिंदे व अनिल जाधव हे सोमवार दि.८ जुलै पासून उपोषणास बसले होते.त्यांच्या उपोषणास शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांनी पाठींबा देत दि.१५ जुलै २०२४ रोजी नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन देखील केले होते.

 

              उपोषणकर्ते शिंदे व जाधव यांच्या अनुकंपा नोकर भरती प्रकाराच्या बाबत शिवसेनेच्या वतीने देवेंद्र लांबे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधत जिल्हाधिकारी कार्यालय येथे सातत्याने पाठपुरवा केला होता.

 

            याच विषयास अनुसरून भाजपाचे युवा नेते तथा राहुरी विधानसभेचे इच्छुक उमेदवार सत्यजित कदम व शिवसेना रा.तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांनी राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या दालनात चर्चा घडवून आणली. कैलास शिंदे यांना सामान्य प्रशासन विभाग,महा.शासन यांचे शासन निर्णय दि.२१.९.२०१७ मधील अनु.क्र.१६ नुसार उपलब्धते अभावी गट “क” मधील पडा ऐवजी गट “ड” मध्ये नियुक्ती मध्ये तरतूद आहे.पद उपलब्ध झाल्यानंतर गट “ड” मध्ये नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना गट “क” प्राधान्याने नियुक्ती द्यावी अशी तरतूद असल्याचे पत्र राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ठोंबरे यांनी पत्र दिले.दिलेल्या पत्रा नुसार कैलास शिंदे यांना राहुरी नगर परिषदेत पुढील आठ दिवसात नियमा प्रमाणे “ड” वर्गात तात्काळ नियुक्ती देण्याची ग्वाही देण्यात आलेली आहे.तसेच अनिल जाधव यांच्या अनुकंपा नोकर भरती बाबत शासनाचे मार्गदर्शक तत्वे तपासून त्यांच्यासाठी देखील प्रयत्न करणार आहे असे सांगितले. त्यामुळे कैलास शिंदे व अनिल जाधव यांनी सत्यजित कदम व देवेंद्र लांबे यांच्याशी चर्चा करत लिंबू सरबत घेत उपोषण मागे घेतले. या प्रसंगी शिवसेनेचे रोहित नालकर,महेंद्र शेळके,बंटी पटारे,अशोक तनपुरे,प्रशांत खळेकर,नयन शिंगी आदी उपस्थित होते.

         

             . शिवसेनेच्या वतीने राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांनी पिडीत उपोषणकर्त्यांचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी कार्यालय अ`नगर,राहुरी नगर परिषद येथे सातत्याने पाठपुरावा केला व न्याय मिळून दिला त्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.*