*राहुरी कृषी विद्यापीठात महात्मा फुले यांची 135 वी पुण्यतिथी साजरीकरून त्यांस अभिवादन करण्यात आले*

*राहुरी कृषी विद्यापीठात महात्मा फुले यांची 135 वी पुण्यतिथी साजरीकरून त्यांस अभिवादन करण्यात आले*

        महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे मुख्य प्रवेशद्वारा समोरील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास त्यांच्या 135 व्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अभिवादन करताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव श्री. व्ही. टी. पाटील म्हणाले की महात्मा फुले यांनी केलेले कार्य खूप मोठे असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पहिला पोवाडा लिहिला. पुण्यामध्ये भिडे वाड्यात महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. अशा प्रकारे महिलांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून सर्वांना दिशादर्शक ठरेल असे काम केले. सहाय्यक कुलसचिव (का.व्य.) व विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी श्री. महेश घाडगे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा विभागातील लिपिक श्री. रविराज काळे, सुरक्षा पर्यवेक्षक डी. एन. जाधव, श्री.दत्तू अडसुरे, श्री.राहुल पवार, श्री.कल्याण मेटे, श्री.तुषार गिरगुणे वाहनचालक श्री. विष्णू गायकवाड, मिस्तरी श्री. औटी, सुरक्षारक्षक श्री. विश्वास बोर्डे, श्री.अक्षय परदेशी, श्री. अनिल नजन व श्री. रमेश थोरात,भारतीय पत्रकार संघठणचे जिल्हा अध्यक्ष श्री सचिन पवार हे ही यावेळी उपस्थित होते.