पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब डोंगरे यांनी पर्यावरण प्रेमी सदस्यांना सोबत घेऊन पुलावरील प्लास्टिक पिशव्या घेतल्या काढून ;नदीचा पूल झाला एकदम स्वच्छ .

पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब डोंगरे यांनी पर्यावरण प्रेमी सदस्यांना सोबत घेऊन पुलावरील प्लास्टिक पिशव्या घेतल्या काढून ;नदीचा पूल झाला एकदम स्वच्छ .

कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या छोट्या पुलावर गणेश भक्तांकडून निर्माल्य नदी पात्रात टाकल्यावर प्लास्टिक पिशव्या पूलाच्या काठ्यांच्या लोखंडी पाईपला बांधून ठेवल्या जातात. 

नदीच्या पात्रात प्लास्टिक जाऊ नये ही चांगली भावना भक्तांची आहे. परंतु यामुळे पुलाला विद्रुप रूप प्राप्त होते. निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष श्री.बाळासाहेब डोंगरे यांनी आपल्या पर्यावरण प्रेमी सदस्यांना सोबत घेऊन पुलावरील प्लास्टिक पिशव्या काढून टाकल्या.

निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने शहरातील सर्व गणेश भक्तांना आहवान करण्यात येत की कोपरगाव नगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणी निर्माल्य टाकून प्लास्टिक च्या पिशव्या नदीत किंवा पुलाच्या कठड्यांला न बांधता योग्य ती विल्हेवाट लावावी ही विनंती केलीआहे. 

या सामाजिक कार्यात कोपरगाव तालुका समन्वयक श्री. भागिनाथ आसने, पर्यावरण प्रेमी श्री. केशव बनकर, श्री. किरण भोईर यांनी योगदान दिले.