एटीएम मशीन चोरी करणारे टोळी 7,52,000/- रु . किंमतीच्या मुद्देमाला सहित 48 तासाच्या आत जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.
समशेरपुर, ता. अकोले येथील ए.टी.एम. मशिन चोरी करणारी टोळी 7,52,000/- रुपये किमतीच्या मुद्देमालासह 48 तासांचे आत जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.
Delhi91 News ची विशेष बातमी .
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 23/12/2023 रोजी रात्री 12 ते सकाळी 06.00 वा. चे दरम्यान समशेरपुर फाटा, ता. अकोले येथील आदिवासी सहकारी सोसायटी कॉम्प्लेक्सचे गाळ्यामधील इंडिया 1 पेमेंट लि. कंपनीचे ए.टी.एम. मशिनला दोरखंड बांधुन ए.टी.एम. मशिन बोलेरो गाडीने बाहेर ओढुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे. सदर घडलेल्या घटनेबाबत फिर्यादी नामे नितीन सखाराम पाटील वय 38 वर्षे, रा. 202 माय होम सोसायटी, शहानुरवाडी, जि. संभाजीनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अकोले पोलीस ठाणे गु.र.नं. 837/2023 भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यामध्ये एकुण 90,000/- रुपये किमतीचे मशिन व त्यामधील रोख रक्कम चोरी गेलेली आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये ए.टी.एम. मशिन चोरीच्या घटना घडत असल्याने राकेश ओला , पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष पथक नेमुण कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, सफौ/ राजेंद्र देवमन वाघ, पोहेकॉ/बबन मखरे, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, बापुसाहेब फोलाणे, पंकज व्यवहारे, पोना/रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, संतोष खैरे, विशाल गवांदे, पोकॉ/अमृत आढाव, मेघराज कोल्हे, रणजीत जाधव अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुण ए.टी.एम. चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
स्थागुशा चे वरील पथक समशेरपुर परिसरामध्ये जावुन गुन्हा ठिकाणचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासत असतांना गुन्ह्यातील आरोपी हे केळी रुम्हणवाडी मार्गे गेल्याचे दिसुन आले. पथक सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन आरोपींचा शोध घेत असतांना पोनि दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील ए.टी.एम. मशिन हे आरोपी नामे भरत लक्ष्मण गोडे रा. तिरडे ता. अकोले याने व त्याचे इतर साथीदारांनी चोरुन नेले असल्याची माहिती मिळाल्याने प्राप्त माहिती पथकास कळवुन सदर आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या. पथक आरोपी भरत लक्ष्मण गोडे याची माहिती घेत असतांना तो त्याचे राहते घरी त्याचे इतर साथीदारांसह थांबलेला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी जावुन खात्री करता भरत गोडे याचे घरासमोर 5 इसम संशयीतरित्या थांबलेले असल्याचे दिसले.
पथकाची बातमीतील हकीगतीप्रमाणे खात्री होताच सापळा रचुन संशयीत इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) भरत लक्ष्मण गोडे वय 24 वर्षे, रा. तिरडे, ता. अकोले, 2) सुर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे वय 23 वर्षे, रा. सदर, 3) अशोक रघुनाथ गोडे वय 25 वर्षे, रा. सदर, 4) सुयोग अशोक दवंगे वय 20 वर्षे, रा. हिवरगांव पठार, ता. संगमनेर, 5) अजिंक्य लहानु सोनवणे वय 21 वर्षे, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे गुन्ह्याबाबत सखोल विचारपुस करता त्यांनी त्यांचा फरार साथीदार नामे 6) गणेश लहु गोडे रा. तिरडे ता. अकोले, जि. अहमदनगर याचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली. आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे ए.टी.एम. मशिनबाबत विचारपुस करता त्यांनी सदरचे ए.टी.एम. मशीन बोलेरो गाडीमध्ये टाकुन म्हसवड वळणाचा घाट, एकदरी गांवचे शिवारात नेवुन गॅस कटरने कट करुन त्यामधील पैसे वाटुन घेतले असल्याचे सांगितले.
मिळुन आलेल्या आरोपींची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये व कब्जात 1,42,000/- रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी, गुन्ह्याचे वेळी वापरलेले मोबाईल व तुटलेले ए.टी.एम. मशिन काढुन दिल्याने एकुण 7,52,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी अकोले पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपी भरत लक्ष्मण गोडे हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द खालीलप्रमाणे घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहे.
सदरची कारवाई राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर , अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.