भाऊसाहेब सावंत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल देडगाव ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण) नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील मन्वंतर सामाजिक संस्थेच्या वतीने भाऊसाहेब सावंत सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा देडगाव ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक जनार्दन कदम होते . यावेळी मुळा संस्थेचे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे, बालाजी देवस्थान ट्रस्ट, मुस्लीम समाजाच्या वतीने, ज्ञानेश्र्वर कारखान्याच्या वतीने ,देडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने व विविध संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. या अगोदरही दिव्यांग संस्थेच्या वतीने हिवरे बाजारचे आदर्श पोपटराव पवार यांच्या हस्तेही दिव्यांग भूषण पुरस्कार मिळाला होता.
यावेळी आदर्श शिक्षक भाऊसाहेब सावंत सर बोलताना म्हणाले की , हा माझा पुरस्कार नसून सर्वांचा आहे. या गावामध्ये मी शाळा शिकलो मला ज्या शिक्षकांनी घडवलं यांच्यामुळे मी आदर्श शिक्षक म्हणून माझी निवड झाली मी सर्व देडगाव ग्रामस्थांचे मनापासून आभारी आहे.
यावेळी प्रगतशील बागातदार शेतकरी बन्सी पाटील मुंगसे,(कांदे पाटील), बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे, अशोक पाटील मुंगसे, अहिल्याबाई होळकर शाळेचे मा. मुख्याध्यापक भाऊराव मुंगसे सर ,संजय मुंगसे ,गणपत तात्या कोकरे, उद्योजक बाळासाहेब चोपडा , सोसायटीचे संचालक जनार्दन देशमुख ,मा.सरपंच दत्ता पाटील मुंगसे, मुरलीधर पाटील मुंगसे, दत्तू आप्पा तांबे,
नारायण मुंगसे, व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार सुभाष मुंगसे यांनी मानले.