चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून राबवलेल्या विशेष मोहिमे दरम्यानएक एक आठवड्यामध्ये एकूण 232 केसेस 130200 /-रुपये दंड वसूल

चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून राबवलेल्या विशेष मोहिमे दरम्यानएक  एक आठवड्यामध्ये एकूण 232 केसेस 130200 /-रुपये दंड वसूल
चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून राबवलेल्या विशेष मोहिमे दरम्यानएक  एक आठवड्यामध्ये एकूण 232 केसेस 130200 /-रुपये दंड वसूल

*दिनांक 30/09/2025*

 *चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून राबविलेल्या विशेष मोहिमे दरम्यान आठवड्यात एकुण २३२ केसेस १३०२०० /- रुपये दंड वसुल* 

आज 21 विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई

  

                 राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बऱ्याचशा दुचाकी गाड्या ह्या चोरांकडून अल्प दरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशन ने आज दिनांक 23/09/2025 रोजी ते ३०/९/२०२५ पर्यंत विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती. 

सदर मोहिमेदरम्यान २३२दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आढळून आली त्या वाहनांवर १३०२००रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली असून *दि.2309/2025 रोजी 38 केसेस दंड 20000/ दि.24/09/2025 रोजी 35 केसेस दंड 18500 अशा २५/९/२०२५ रोजी ४० केसेस २४००० रुपये दंड २६/९/२०२५ रोजी ३६ केसेस १९७०० रुपये दंड २७/९/२०२५ रोजी १४ एस केसेस ७५००२८/९/२०२५ रोजी ११ केसेस ८५०० रुपये दंड २९/९/२०२५ रोजी ३७ केसेस २०५०० रुपये दंड ३०/९/२०२५ रोजी २१ केसेस ११५०० रुपये दंड असा दिनांक २३/९/२०२५ ते दिनांक ३०/९/२०२५ पावेतो एकुण २३२केसेस दंड १३०२०० /-रुपये दंड वसुल केला* राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपल्या दुचाकी चार चाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही.. तसेच सर्व नागरिकांनी नंबर प्लेट बसवलेले असल्यास चोरीचे वाहन शोधणं सोप होईल. 

सदर मोहीम ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे साहेब , अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री देवदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात पोसई संप्तर्षीं सफौ.आव्हाड पोहे का दरेकर ठोंबरे , पो.हे.काँ.फुलमाळी होमगार्ड कर्मचारी यांच्या पथकाने केलेली आहे.

नवीन वाहनांवर नंबर प्लेट नसल्याने कारवाई करण्यात आली आहे तसेच सदरील वाहने नंबर प्लेट न लावता शोरूमच्या बाहेर रोडवर आल्याने शोरूम वाल्यांना आरटीओ द्वारे पत्र पाठवून कारवाई करण्यात येईल

     तसेच पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नये. अल्पवयीन मुले वाहन चालवताना मिळून आल्यास त्यांच्या पालकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल.