पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा निषेध नेवासा एकता पत्रकार संघ ,मराठी पत्रकार परिषदेकडून व भारतीय पत्रकार संघटनेकडून कारवाईचे निवेदन.
प्रतिनिधी खेडले परमानंद ,नेवासा
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन वरील हल्ल्याचा निषेध नेवासा एकता पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषदेकडून व भारतीय पत्रकार संघटनेकडून कारवाईचे निवेदन.
बाळकृष्ण पुरोहित सरांच्या मार्गदर्शनाखालीसहाय्यक पोलीस निरीक्षक सोनई यांना देण्यात आले.
संदीप महाजन यांच्यावर बुधवारी भ्याड हल्ला झाला. तत्पूर्वी त्यांनी दिलेल्या बातमी वरुन आमदार किशोर पाटील यांनी आवार्च भाषेत महाजन यांना शिवीगाळ केली होती त्याची.रेकाॅर्डिंग व्हायरल झाल्यावर आख्खा महाराष्ट्र नि:स्तब्ध झाला. त्यानंतर त्यांना जावे मारण्याची धमकी देखील दिली. हे संतापजनक , निषेधार्ह आहे.
गुरुवारी सकाळी गावगुंडांनी आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांकडून पत्रकार संदीप महाजन यांचेवर हल्ला केला .तो ही व्हिडिओ सोशल व्हायरल झाला आहे. ज्या गावगुंडांनी हल्ला केला ते आ किशोर पाटील बरोबर असतात असा महाजन यांचा आरोप आहे.
अर्वाच्य शिवराळ भाषा वापरुन ,धमकी देणारे,व गावगुंडांनकडुन हल्ला करणा-या सुत्रधार यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषद नेवासा शाखा यांचे वतीने सोनई पोलिस स्टेशन मधे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे व भारतीय पत्रकार संघटनेचे विजय खंडागळे, संभाजी शिंदे,नवनाथ कुसळकर, दिलीप शिंदे, संतोष टेमक, मोहन शेगर, रविंद्र शेटे,आशोक भुसारी,संजय वाघ, अविनाश राऊत उपस्थित होते.