प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अहमदनगर जिल्ह्याचा महाराष्ट्रात तिसरा क्रमांक .

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अहमदनगर जिल्ह्याचा महाराष्ट्रात तिसरा क्रमांक .

 

नगर वार्ताहर// दि30  संभाजी शिंदे

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये  दाखलपूर्व ४४०६८ इतकी प्रकरणे, प्रलंबित २६६८ व विशेष मोहिम अंतर्गत १३८६ इतकी प्रकरणे  निकाली निघालेली आहेत. लोक अदालतमध्ये ७४ कोटी ५६ लाख ३१ हजार ४५७ इतक्या रुपयांची वसुली झाली आहे. 

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, अहमदनगर बार असोसिएशन, अहमदनगर आणि सेंट्रल बार असोसिएशन, अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २८/०९/२०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन अहमदनगर जिल्हा न्यायालय, सर्व तालुका न्यायालयांमध्ये करण्यात आले. राष्ट्रीय लोक अदालतीचा  उद्घाटन समारंभ जिल्हा न्यायालय, अहमदनगर येथे संपन्न झाला. राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन रोपट्याला पाणी घालून पक्षकार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्रीमती अंजु शेंडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर या होत्या. सदर कार्यक्रमास श्री. एन.आर. नाईकवाडे, जिल्हा न्यायाधीष-1, अहमदनगर, श्रीमती भाग्यश्री का. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, मा.श्री. साहेबराव डावरे, अति. जिल्हा शल्यचिकित्सक, अहमदनगर, अॅड. श्री. सतिश पाटील, जिल्हा सरकारी वकील, अॅड. श्री. महेश शेडाळे, उपाध्यक्ष, अहमदनगर बार असोशिएशन, अहमदनगर, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

 

सदर कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव,श्रीमती भाग्यश्री काशिराम पाटील यांनी केली. राष्ट्रीय लोक अदालतीच्या उद्घाटनाच्या वेळी अॅड. श्री.अॅड.भूषण ब-हाटे, अॅड. अनिल सरोदे, श्री.अॅड. अभय राजे, श्री. अॅड. राजाभाउ शिर्के व माननीय न्यायीक अधिकारी उपस्थित होते. अॅड. अभय राजे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले व अॅड.श्री. राजाभाउ शिर्के यांनी आभार मानले .