सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची माहेरी येऊन आत्महत्या.
प्रतिनिधी संभाजी शिंदे खेडले परमानंद.सामनगाव तालुका शेवगाव येथील विवाहितेने माहेरी गेवराई तालुका नेवासा येथे येऊन सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार दिनांक 20 जून 2022 रोजी घडला आहे.
याबाबतची फिर्याद मयत विवाहितेची आई अर्चना नानासाहेब कर्डिले यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिली आहे.
की त्यांच्या मुलीचा विवाह 24.4.2022 रोजी सुधीर सुरेश कापरे राहणार सामनगाव तालुका शेवगाव यांच्याशी झाला होता.
ठरल्याप्रमाणे हुंड्याच्या स्वरूपात सुधीर कापरे यांना पाच लाख रुपये, सहा तोळे सोन्याचे दागिने दिले होते.
हुंड्याचे राहिलेले 1,75,000 सोनाराचे पैसे व मोटरसायकल घेण्या साठी माहेरून पैसे दिले नाहीत म्हणून सदर मुलीचा शारीरिक व मानसिक छळ खूप दिवसापासून केला जात होता.
त्याचप्रमाणे मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी मानसिक त्रास दिला जात होता.
या सर्व त्रासाला कंटाळून सदर विवाहितेने माहेरी येऊन विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला.
नेवासा पोलीस ठाण्यात सासु मुक्ताबाई कापरे, सासरा सुरेश कापरे, नवरा सुदाम कापरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल.
या मुलीच्या माहेरच्या लोकांनी झालेल्या प्रकाराबाबत राग व्यक्त करत निषेध म्हणून मुलीचा अंत्यविधी सासरच्या राहत्या घरासमोर केला.