मुळा नदी पात्रात बुडून पिंप्रि येथील तरुणाचा मृत्यू.
प्रतिनिधी :-वळण ३१जोनेवारी
आज दुपारी मुळा नदी पात्रात बुडून अनिल जाधव नामक पिंप्रि वळण येथील इसमाचा अकस्मात मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे की आज दुपारी पोहण्यासाठी
नदीपात्रात उडी घेतल्यानंतर खूप वेळ अनिल जाधव हे वरती आले नाही. हे बघून जवळपास असलेल्या तरुणांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले व त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन ते तीन तास अथक परिश्रम करूनही ते सापडले नाही.
अखेर पाच वाजण्याच्या सुमारास अनिल जाधव हे मृतावस्थेत,, त्यांना शोधत असलेल्या तरुणांना सापडले.
त्यानंतर त्यांना पंचनामा करून शव- विच्छेदननासाठी राहुरी या ठिकाणी नेण्यात आले.