महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात गांधी जयंती साजरी
महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात गांधी जयंती साजरी
खेडले परमानंद वार्ताहर // दि 2
महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शिरेगाव खेडले येथे महात्मा गांधी यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी मुळा एज्युकेशन सोसायटीचे नियोजन अधिकारी पी. डी. मोरे सर व क्रीडा अधिकारी श्री पाटील तुवर सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील शिक्षण प्रेमी ज्येष्ठ नागरिक सूर्यभान पाटील आघाव हे होते. कार्यक्रमासाठी शालेय समितीचे सदस्य दगू बाबा हवालदार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी जाधव, गावातील शिक्षण प्रेमी नागरिक शाळा शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक पालक संघाचे सदस्य उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. बी. सोनवणे यांनी प्रास्ताविक केले .
मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जाधव सर, श्री गडाख सर, कानडे सर, बेल्हेकर सर, कदम सर, गवळी मॅडम, ज्ञानदेव तुवर व श्री मच्छिंद्र होन यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव एस. एस. यांनी केले तर आभार लांघे डी.बी. यांनी मानले.