वंचित बहुजन आघाडीच्या वतिने नगर मनमाड रोड दुरुस्ती करीता लाँग मार्च व रोडवर भिक्षा मागुन १५१ रु दिले शासनाच्या तिजोरीत रोड दुरुस्तीकरीता .
प्रति,
मान.तहसिलदार,
तहसील कार्यालय राहुरी
ता.राहुरी, जिल्हा. अहमदनगर
विषय: दिनांक २५ सप्टेंबर २२ पासून वंचितचा नगर मनमाड रस्त्यासाठी पायी लॉग मार्च सुरू असल्याने राहुरी तालुक्याच्या जनतेच्यावतीने पायी लॉग मार्च मधून जमलेला निधी केंद्रीय वाहतूक मंत्री भारत सरकार यांना राहुरी प्रशासनाने द्यावे याबाबत व प्रशासनाचा जाहीर निषेध करत असल्याचे कळविण्याबाबत.
महोदय,
अहमदनगर ते मनमाड रस्त्याची दूर अवस्था संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला व महाराष्ट्रातील जनतेसह जिल्ह्यातील खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधी यांना माहीतच आहे असंख्य बळी या रस्त्याच्या अपघातामध्ये गेलेले आहेत, तसेच असंख्य जखमी झालेले आहेत व सध्या अपघाताच्या घटनाही घडत आहेत, यामुळे असंख्य कुटुंब बेवारस झाले आहेत. याचा निषेध म्हणून सावळीविहीर ते अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय दिनांक २५ सप्टेंबर २०२२ पासून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मूलभूत हक्क रस्त्याच्या दुरुस्तीसाठी "मी नगर मनमाड रस्ता बोलतोय" या मथळ्याखाली विविध मागण्यांसाठी लॉग मार्च सुरू आहे, सध्या हा पायी लॉग मार्च आज दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी राहुरी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे आगमन झाले आहे, राहुरी शहरातील जनतेच्या वतीने .१५१ रुपये इतके रुपये जमलेले आहेत जमलेल्या निधीचे भारत सरकार केंद्रीय वाहतूक मंत्री यांना राहुरी तालुक्याचे तहसीलदार यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पायी लॉग मार्च रॅलीतून जमलेला निधी १५१ रुपये केंद्रीय मंत्र्यांना भीक म्हणून जमलेला इतका निधी केंद्रीय मंत्र्यांना आम्ही आज तहसीलदार तहसील कार्यालय राहुरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे सुपूर्द करत आहोत व त्यांनी आज जमलेला हा निधी त्वरित रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री यांना तात्काळ निधी पाठवावा असे आम्ही त्यांना आज लेखी निवेदनाद्वारे देऊन रस्त्याचे कामाचे गांभीर्य कृतिशील मार्गाने संघर्ष करत आहोत याची जाणीव करून देत आहोत. तसेच रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे रस्त्याचे काम वेळेत सुरू केले नाही, म्हणून आम्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार तसेच महाराष्ट्र शासन व केंद्रसरकारचा निषेध करतो. पायी सुरू असलेल्या लॉग मार्चसाठी अहमदनगर जिल्ह्यातील जनसमुहाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू केले नाही तर तालुक्यातील व जिल्ह्यातील जनतेच्या वतीने मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल श्री. संदीप कोकाटे.संतोष चोळके.विशाल कोळगे.आनिल जाधव.डॉ. जालिंदर घिगे. बाबा साठे.वर्षाताई बाचकर.डॉ. विजय मकासरे.निलेश जगधने. पिंटुनाना साळवे. साईनाथ.बर्डे.बाळासाहेब जाधव. आकाश दिवे.कैलास बुळे.ज्योती गायकवाड. मनिषा.साळवे.दुर्गेश वाघ.आदी कार्यकर्ते यावेळी या लाँगमार्च ला उपस्थीत होते.असाही तीव्र इशारा आम्ही प्रशासनाला देत आहोत.
कळावे,
माहितीस्तव प्रत
मान. रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री भारत सरकार, दिल्ली
मान. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई
मान. जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर,