पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या हस्ते उत्तुंग यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा करण्यात आला सन्मान .

पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या हस्ते उत्तुंग यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा करण्यात आला सन्मान .

राहुरी तालुक्यातील प्रिंपी अवघड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये उत्तुंग यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा शनिवारी सायंकाळी पार पडला . या सोहळ्याचे आयोजन लायन्स स्पोर्ट क्लब व रामराज्य ग्रुप तर्फे करण्यात आले होते . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राहूरीचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांची उपस्थिती लाभली होती . या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिंद्र लांबे यांनी केले .यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांचा सन्मान ज्ञानदेव पवार व चंद्रकला पवार यांच्या हस्ते करण्यात आला .

 

        अथक परिश्रम जिद्द चिकाटीच्या जोरावर राज्य कर निरीक्षक पदाला गवसणी घालून गावाचा नावलौकिक वाढवणाऱ्या अनुजा ज्ञानदेव पवार हीचा सन्मान पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी शासनाच्या विविध विभागामध्ये शासकीय नोकरी मिळविलेले यागेश लांबे ( तालुका कृषी अधिकारी ), चंद्रशेखर लांबे ( कृषी सहाय्यक ), प्रशांत वाघ (कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी ), महेश बाचकर (आरोग्य सेवक ), राहुल फडतरे (कनिष्ठ सहाय्यक महावितरण ), शुभम गायकवाड (म. फु. कृ. वि ), मुजफ्फर पठाण ( महाराष्ट्र पोलीस ),मुस्कान पठाण ( महाराष्ट्र पोलीस ) यांचाही सन्मान पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख व ह.भ .प.अमोल महाराज पिसे यांच्या हस्ते करण्यात आला .

 

 

       या कार्यक्रमासाठी पिंपरी अवघड गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक,माता भगिनी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले तर शेवटी कार्यक्रमाचे आभार शिक्षक अनिल पवार यांनी मानले .                               

 

*पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी केले मोलाचे मार्गदर्शन*

ज्याला जिंकायचं असतं तो तुटलेल्या तलवारीने ही लढतो,पण ज्याला पळायचं असतं त्याला ढाल ही ओझं वाटते,इतिहास कारणे देणारे नाही तर प्रयत्न करणारे घडवतात असे उद्गार निरीक्षक देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना केले . तुमच्या हातून घडणाऱ्या समाजसेवेचे मोल होणार नाही . तुमचे गाव अधिकाऱ्यांचे गाव होण्यासाठी पॅटर्न तयार करा .पाल्यांवरील नजर हटली तर दुर्घटना निश्चित आहे पालकांनी चौकस राहण्याची गरज आहे असा सूचक इशाराही निरीक्षक देशमुख यांनी उपस्थितांना यावेळी दिला .

 

*सन्मान सोहळ्या दरम्यान अनुजासहीत संपूर्ण परिवाराच्या डोळ्यात आनंदाश्रु*

आपल्या यशाच्या यशोगाथेची कडी उलगडताना अनुजा सहित संपूर्ण परिवाराच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहताना दिसत होते .यावेळी उपस्थितांसमोर बोलताना तिने सांगितले की यश हे एका दिवसात मिळत नाही . त्यासाठी जिद्द, चिकाटी, परिश्रम,मोबाईलचा नगण्य वापर, त्याचबरोबर संपूर्ण परिवाराचा त्याग हा कारणीभूत असतो .तिच्या या यशामागे आई-वडील, बहिण -भाऊ, दाजी तसेच चुलते -चुलती यांचे मोठे सहकार्य लाभल्याचे तिने यावेळी सांगितले .

 

 

*मुजफ्फर पठाणचे मनोगत ऐकताना पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख झाले आश्चर्यचकित* .

अतिशय हालाकीच्या परिस्थितीत व टेलरिंग चे काम करून आमचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या आई-वडिलांच्या मेहनतीचे हे फळ आहे आणि त्याची जाणीव ठेवून हे गाव पिंपरी अवघड या नावाने नाही तर अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे उद्गार आपले मनोगत व्यक्त करताना मुजफ्फर पठाण यांनी केले .यावेळी छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले,संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणादायी मांडणी उपस्थितांसमोर केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला तसेच त्याच्या या विचाराचे सर्वांनी कौतुक केले .