सेवा संकल्प अभियान अंतर्गत सावित्रीबाई फुले माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयातील एनसीसी आणि हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम .
सेवा संकल्प अभियान अंतर्गत सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एनसीसी आणि हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्रमा अंतर्गत राहुरी शहरातील मुळा नदी पुलावरील पुलावरील सफाई विद्यार्थ्यांनी केली. अनेक गणेश भक्त आपल्या घरातील निर्माल्य पिशवीत आणून निर्माल्यमुळा नदी पात्रात टाकतात आणि प्लास्टिक पिशवी पुलाच्या कठाड्यावरील लोखंडे अँगल ला बांधून ठेवतात .

नदीपात्र खराब होऊ नये हा त्यांचा हेतू परंतु पुलावर असंख्य प्लास्टिक पिशव्या बांधल्यामुळे पुलाला अतिशय विद्रूप रूप प्राप्त होते. याची दखल विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण तुपविहिरे ,उप मुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, एनसीसी अधिकारी संतोष जाधव ,हरित सेना सचिव तुकाराम जाधव यांनी घेतली .सात विद्यार्थी व चार शिक्षकांच्या मदतीने सर्व प्लास्टिक पिशव्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम यांनी केले .नदी व नदीचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी आपल्या घरातील निर्माल्य योग्य त्या ठिकाणी टाकून प्लास्टिक पिशवी नदीमध्ये किंवा नदीवरील पुलाच्या कठड्याला न बांधता राहुरी नगर परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणीच टाकावी असे आवाहन विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक श्री .अरुण तुपविहीरे यांनी सर्व गणेश भक्तांना केले .
या उपक्रमात युवराज धोंडे ,कृष्णा सोनवणे ,हर्षदा गवळी ,समीक्षा तांबे ,समृद्धी पिंगळे ,आकांक्षा लांडगे आणि सिद्धांत राजे मेटकर यांनी सहभाग घेतला .








