लेविन भोसले यांनी केलेल्या सन्मानामुळे भारावून गेलो-रा रे फा बिशप र्अंम्ब्रोज रिबोलो, औरंगाबाद
श्रीरामपूर(वार्ताहर) - परमेश्वर आपल्या सतकृत्याला सदैव आशीर्वाद देत असतो. प्रभू येशू सर्वांवर दया करतो, मानवतेची सेवा करणाऱ्यावर कृपा करतो. अशाच विचारावर श्रद्धा ठेवणारे, मनोभावे करणारे कार्य करणारे लेविन भोसले यांनी केलेल्या सन्मानामुळे मी भारावून गेलो, असे भावपूर्ण उदगार छत्रपती संभाजीनगर येथील बिशप अंम्ब्रोज रिबेलो यांनी व्यक्त केले.
येथील प्रकाश किरण प्रतिष्ठानतर्फे रा रे फा बिशप अंम्ब्रोज रिबेलो यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल देऊन त्यांच्या अपूर्व धर्मकार्य व समाजसेवेचा आदर्श ठेवून अमृत महोत्सवी जीवन वाटचाल करणारे बिशप रिबेलो यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते लेविन भोसले लिखित' दया,क्षमा,शांती' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले त्याप्रसंगी बिशप अंम्ब्रोज रिबेलो बोलत होते. प्रारंभी लेविन भोसले यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. पुस्तकाचे महत्व सांगितले. प्रकाश किरण प्रकाश प्रतिष्ठानने १६ वर्षापासून केलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. किरण भोसले यांनी मानपत्र वाचन केले. यावेळी हरेगाव भूमिपूत्र फादर क्षीरसागर, फादर मार्कस रुपटक्के इग्नाथी, फादर जॉन दिवे उपस्थित होते. फादरांनी लेविन भोसले यांचे कार्य आणि शैक्षणिक सेवेबद्दल गौरवोद्गार काढले. लेविन भोसलेसर हरेगाव येथे संत तेरेजा बॉईज हायस्कूलमध्ये विज्ञान शिक्षक होते. त्यांनी शाळेत नवनवीन उपक्रम राबविले. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक असल्याने सेवानि वतीनंतरही त्यांना विद्यार्थी भेटतात, मार्गदर्शन घेतात. सौ.विजयाताई भोसले, किरण भोसले, आकाश भोसले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. बिशप अंम्ब्रोज रिबेलो यांनी' दया, क्षमा,शांती' या पुस्तकाच्या निर्मिती विषयी कौतुक केले. लेविन भोसले हे सेवाभावी लेखक आहेत. ते कधीच स्वस्थ बसलेले मी पाहिले नाहीत, ते विविध सामाजिक कार्यात सतत कार्यरत, सहभागी राहतात.त्यांच्या कार्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या साहित्य,शिक्षण, धर्माच्या आदर्श कार्याचा वसा आणि वारसा आजच्या तरुणांनी जपला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. सौ. विजयाताई भोसले यांनी आभार मानले. Delhi 91 Bps Live News Reporter Nikale Prakash, Shrirampur.