खोटे वारस दाखवून मालमत्ता हडपली डिग्रस गावातील खळबळ जनक घटना ..

खोटे वारस दाखवून मालमत्ता हडपली डिग्रस गावातील खळबळ जनक घटना ..

   डिग्रस ता राहुरी येथील रहिवासी नाना तुकाराम पवार यांची गावठाण हद्दीतील वडिलोपजीत मालमत्ता सिटी सर्वे नं १६१ ही २५३ चौरस मीटर बखळ जागा गावातील रंभाजी बाबुराव गावडे , आणी त्यांचा नेवासा येथे कृषी मंडळ अधिकारी असलेला मुलगा प्रमोद रंभाजी गावडे यांनी परस्पर हडप केल्याची खळबळ जनक घटना घडली असुन या मालमत्तेचे मुळ वास नाना तुकाराम पवार यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकाकडे तक्रार दाखल केली आहे . या तक्रारी मध्ये श्री पवार यांनी म्हटले आहे की माझे वडील नाना तुकाराम पवार हे ११ / १० / १९८६ रोजी मयत झाले त्यांना आम्ही दोन भाऊ , दोन बहीणी , आणी आमची आई ह्या शेत जमीनीला वारस लागलो आहोत मात्र घराच्या बखळ जागेला वारस लावण्याचे राहुन गेले त्याचा गैरफायदा घेऊन रंभाजी गावडे यांनी दि ८ / ११ / २०२१ रोजी त्यांच्या ओळखीची महिला साखर बाई मुरलीधर पटारे ह्या मयत नाना तुकाराम पवार यांना एकमेव वारस असल्याचे खोटे कागदपत्र सादर करून सिटी सर्वे ला नोंद लावून घेतली आणी लगेचच दि २५ / ११ / २०२१ रोजी प्रमोद रंभाजी गावडे यांचे नावावर खरेदीखत करून घेतले सदर खोटी वारस नोंद लावून घेताना मयत तुकाराम मुक्ता पवार यांना आम्ही मुळ वारस असल्याचे माहीत असुनही विद्यमान सरपंच बर्डे यांनी मयत तुकाराम पवार यांना साखरबाई मुरसीधर पटारे ही एकमेव वारस असल्याचे पत्र देऊन ह्या कटात सामील झाले

तसेच योगेश दिलीप पवार यांनी स्वःताचे नावावरचा ग्राम पंचायत मिळकत नं ०००२/०७४/०२ हा च सीटी सर्वे नं १६१ आहे असे दाखवून प्रमोद गावडे यांस खरेदी दिली व आमची वडिलोपर्जीत मालमत्ता परस्पर हडप केली योगेश दिलीप पवार यांनी स्टेट बॅक ऑफ इंडीया शाखा राहुरी च्या सर्विस सेंटर मध्ये लाखो रुपयाचा आपहार केला असुन त्याचेवर राहुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असुन तो जेल मध्ये होता तो सध्या जामीनावर सुटला आहे , तसेच रंभाजी गावडे याने आपल्या कुटुंबातील सर्वच व्यक्तीचे अपंग दाखले मिळवून आपल्या दोन्ही मुलांना खोट्या अपंग दाखल्याच्या आधारे नोकरीस लावले असल्याचे ही या तक्रारीत म्हटले आहे रंभाजी गावडे याने या पुर्वी असेच आपली पत्नी हि एका प्रकल्पग्रस्ताची मुलगी दाखऊन स्वःताच्या मुलीचा प्रकल्पग्रस्त दाखला काढला होता मात्र मुळ प्रकल्प ग्रस्तांचे वारस वेळीच सावध झाल्याने हा प्रकार थांबला रंभाजी गावडे हा अशा प्रकारच्या आफरातफरी बाबत नेहमीच चर्चेत आला आहे , वारस लावतेवेळी खोटे शपथपत्र दाखल केले म्हणुन भादवी कल म १९९ .२०० , १९२/३, अन्वये कारवाई करावी तसेच रंभाजी बाबुराव गावडे , प्रमोद रंभाजी गावडे ,सरपंच पोपट गोपीनाथ बर्डे योगेश दिलीप पवार साखर बाई मुरलीधर पटारे यांचेवर भारतीय नोंदनी अधिनियम १९०८चे कलम ८२ तसेच १८६० मधील तरतुदी तसेच आमची मालता परस्पर हडप केली म्हणुन भा .द .वि . कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी तक्रार केली आहे 

घटने मुळे डिग्रस गावात एकच खळबळ उडाली आहे -