श्री . चांगदेव मोरे व श्री . राहुल शिरोटे हे आहेत एप्रिल महिन्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आयडॉल्स .

श्री . चांगदेव मोरे व श्री . राहुल शिरोटे हे आहेत एप्रिल महिन्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आयडॉल्स .

*श्री. चांगदेव मोरे व श्री. राहुल शिरोटे हे आहेत एप्रिल महिन्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल्स*

*राहुरी विद्यापीठ, दि. 1 एप्रिल, 2023*

           महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून मफुकृवि आयडॉल्स हा उपक्रम दोन वर्षापूर्वी सुरु झालेला आहे. एप्रिल महिन्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे शेतकरी आयडॉल म्हणुन श्री. चांगदेव मोरे व कृषि उद्योजक म्हणुन श्री. राहुल शिरोटे यांची निवड झालेली आहे. श्री. चांगदेव मोरे हे मु.पो. सासुर्वे, ता. कोरेगाव जि. सातारा येथील शेतकरी असून कृषि पदवीधर श्री. राहुल शिरोटे हे मु.पो. कवठे एकंद, ता. तासगाव, जि. सांगली येथील कृषि उद्योजक आहेत. 

             शेतकरी आयडॉल श्री. चांगदेव मोरे यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या निशिगंधाच्या फुले रजनी व सुहासिनी या वाणांचे मोठ्या प्रमाणावर कंद तयार करुन 20 हजार पेक्षा जास्त शेतकर्यांना पुरविले आहेत. ते सन 2017 पासून फुलशेतीचा सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, बुलढाणा व नांदेड या जिल्ह्यांसह मध्यप्रदेश व कर्नाटक या राज्यांमध्ये प्रसार करीत आहेत. श्री. मोरे यांनी मैदानी भागांमध्ये प्रथमच स्ट्रॉबेरी रोपे निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. कृषि उद्योजक श्री. राहुल शिरोटे यांनी कोल्हापूर कृषि महाविद्यालयातुन बी.एस्सी. कृषिची पदवी घेतलेली आहे. त्यांनी सन 2018 साली सुरु केलेल्या राहुल सिड्स प्रा.लि. या त्यांच्या उद्योगामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान वापरुन व पुर्णपणे स्वंयचलीत यंत्राद्वारे धान्याचे ग्रेडींग केले जाते. तयार मालाचे विपणन डी मार्ट, रिलायन्स मॉल, फ्युचर ग्रुप इं. ठिकाणी विक्री केली जाते. ते परिसरातील स्थानीक शेतकर्यांकडून मार्केटपेक्षा जास्त दराने सोयाबीन बियाणे प्लॉटची खरेदी करतात. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक लाभ होत आहे. श्री. शिरोटे यांनी त्यांच्या उद्योगामध्ये स्थानिक तसेच शेजारच्या गावातील 70 पेक्षा जास्त युवकांना वर्षभर रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रदर्शीत करण्यात येतात.